शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

स्वाभिमान योजना १० वर्षांपासून थंडबस्त्यात

By admin | Updated: June 14, 2014 01:54 IST

केंद्र शासनाने २००४ मध्ये बेरोजगार व गरीब आदिवासींच्या उत्थानाकरिता स्वाभीमान योजना सुरू केली.

बल्लारपूर : केंद्र शासनाने २००४ मध्ये बेरोजगार व गरीब आदिवासींच्या उत्थानाकरिता स्वाभीमान योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत भूमिहीन बेरोजगार आदिवासी युवकांना चार एकर कोरडवाहू व चार एक सिंचनाची जमीन देण्याचे ठरवून याकरिता निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. परंतु ही योजना सुरू झाली तेव्हापासून तर आजपर्यंत या योजनेंतर्गत एकाही आदिवासींना त्याचा लाभ मिळाला नाही.अखिल भारतीय आदिवासी मूल निवासी अन्याय निवारण तथा विकास संघाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष येथील डॉ. वसंत मसरात यांनी याबाबत माहिती अधिकारातून माहिती घेतली असता ही बाब उघड झाली आहे. तब्बल नऊ वर्षांपासून एकाही आदिवासीला या योजनेचा फायदा मिळाला नाही. यात अधिकाऱ्यांची उदासिनता आणि आदिवासींकडे शासनाचे दुर्लक्ष दिसून येते. या योजनेकरिता शासनाने जो निधी उपलब्ध करून दिला आहे. तो निधी गेला कुठे, असा प्रश्न डॉ. मसराम यांनी उपस्थित केला आहे. या योजनेंतर्गत आदिवासींना जमिनी का देण्यात आल्या नाहीत, अशी विचारणा त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली असता जमिनीच विकत मिळत नाहीत, असे कारण पुढे केले जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मसराम यांनी स्वत:च्या मालकीची घोडपेठ येथील १६ एकर जमीन शासकीय दराने विक्रीसाठी ठेवली आहे. या योजनेतून आदिवासिंना फायदा मिळेल, हा त्यांचा उद्देश आहे. यासंबंधीत शासकीय अधिकाऱ्यांना तसे लेखी लिहूनही दिले आहे. यासंबंधी मागील तीन वर्षांपासून त्यांनी शासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. मात्र, अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. एकीकडे, या योजनेकरिता शासकीय दराने जमिनी विकत मिळत नाही, अशी ओरड अधिकारी करीत आहे. तर दुसरीकडे शासकीय दरात जमीन विकायला तयार असतानाही याकडे दुर्लक्ष करायचे असे टोलवाटोलवीचे धोरण सुरू आहे. अशाने, योजना कशी यशस्वी व्हायची आणि आदिवासींना त्याचा लाभ कसा मिळायचा, असा प्रश्न डॉ. मसराम यांनी उपस्थित केला आहे. (तालुका प्रतिनिधी)