शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
3
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
4
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
5
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
6
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
7
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
8
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
9
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
10
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
11
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
12
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
13
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
14
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
15
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
16
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
17
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
18
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
19
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
20
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा

संरक्षण मंत्रालयाच्या चमूकडून सैनिकी शाळेच्या जागेची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2016 01:46 IST

चंद्रपुरात सैनिकी शाळा होऊ घातली असून या नियोजित शाळेच्या जागेच्या पहाणीसाठी केंद्रीय चमू दाखल झाली आहे.

तीन वर्षांत उभारणी : देशातील असेल ही २६ वी शाळाचंद्रपूर : चंद्रपुरात सैनिकी शाळा होऊ घातली असून या नियोजित शाळेच्या जागेच्या पहाणीसाठी केंद्रीय चमू दाखल झाली आहे. गुरूवारी या चमूने जागेची पहाणी केली असून या जागेसाठी आणि शाळेच्या उभारणीसाठी सहमती दिर्शविली आहे.केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाअंतर्गत असलेल्या सैनिकी स्कुल सोसायटीचे कॅप्टन जी. रामबाबू व अवर सचिव एन. बी. मणी यांच्यासमवेत ना. मुनगंटीवार यांनी आज विसापूरनजिक असलेल्या सैनिकी शाळेच्या जागेची पाहणी केली. ही चमू आपला अहवाल केंद्र सरकारला सादर करणार आहेत. देशातील २६ वी आणि राज्यातील ही दुसरी सैनिकी शाळा चंद्रपुरात उभारली जाणार असून चंद्रपूरसह गडचिरोली, भंडारा व गोंदिया या सारख्या आदिवासी व नक्षल प्रभावित जिल्ह्यातील मुलांना या शाळेच्या माध्यमातून देशसेवा करण्याची संधी प्राप्त होणार आहे. देशात असलेल्या अनेक सैनिकी शाळापेक्षा चंद्रपुरातील जागा प्रशस्त व सुंदर असल्याचा अभिप्राय संरक्षण विभागाचा असल्याची माहिती आहे. येत्या तीन वर्षात सैनिकी शाळेचे काम पूर्ण होणार आहे. या जागेची संरक्षण भिंत तात्काळ उभारण्याची आणि या जागेच्या सौंदर्यीकरणाचा आराखडा तयार करण्याच्या सूचना ना. मुनगंटीवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला केल्या आहेत. (जिल्हा प्रतिनिधी) विदर्भाच्या विकासात भर पडेल - ना. मुनगंटीवारचंद्रपुरातील या सैनिकी शाळेमुळे विदर्भाच्या विकासात भर पडेल, असा विश्वास वित्तमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी गुरूवारी चंद्रपुरात व्यक्त केला. राज्याच्या विधानसभेने चंद्रपूर येथील सैनिकी शाळेला मंजुरी दिल्यानंतर हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला फेब्रुवारी अखेर संरक्षण खात्याची परवानगी मिळणे अपेक्षित असल्याचे पालकमंत्री म्हणाले. या संदर्भात १२ जानेवारी रोजी केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांचे सोबत मुंबईला चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.