शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..."; हिंदी सक्ती जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर उद्धव ठाकरे नेमकं काय बोलले?
2
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
3
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
4
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
5
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
6
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
7
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
8
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
9
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
10
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
11
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
12
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
13
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
14
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
15
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
16
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
17
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
18
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
19
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
20
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!

वैद्यकीय महाविद्यालयाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

By admin | Updated: July 18, 2015 00:49 IST

चंद्रपूर येथील वैद्यकीय महाविद्यालय २०१५ च्या सत्रापासून सुरु होणार असल्याने जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी शुक्रवारी महाविद्यालयाची पाहणी केली.

चंद्रपूर : चंद्रपूर येथील वैद्यकीय महाविद्यालय २०१५ च्या सत्रापासून सुरु होणार असल्याने जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी शुक्रवारी महाविद्यालयाची पाहणी केली. या पाहणीत त्यांना काही त्रृट्या दिसून आल्या. त्यावर त्वरित अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठता डॉ. प्रदीप दीक्षित, अधीक्षक अभियंता डी.के. बालपांडे, कार्यकारी अभियंता मनोज जयस्वाल, महानगरपालिकेचे शहर अभियंता महेश बारई, इंडियन मेडीकल अशोसिएशनचे राज्य उपाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, डॉ.अनंत हजारे, उपअभियंता मकवाने, एन. बुरांडे तसेच इतर विभागाचे अधिकारी व कत्रांटदार यावेळी उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिका-यांनी मुलांच्या वसतिगृहाच्या इमारतीची पाहणी करुन तेथे पिण्याच्या पाण्याची सुविधा महानगरपालिकेकडून त्वरित करुन घेण्यात यावी, अशा सूचना संबधिताना दिल्या. वसतिगृहामध्ये वीज पुरवठा तात्काळ सुरु करण्यात यावा, असे ते म्हणाले. तसेच विद्यार्थ्यांचा भोजनकक्ष, अधिकारी-कर्मचा-यांच्या निवासस्थानाची व महाविद्यालयातील सर्व विभागाची पाहणी त्यांनी यावेळी केली. त्यानंतर अधिका-यांच्या बैठकीमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे फायर आॅडिट तत्काळ करुन घ्यावे, अशा सूचना केल्या. (प्रतिनिधी)