शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

भाजप पक्षाला साथ द्या, गोंडपिंपरीला स्मार्ट सिटी बनवू

By admin | Updated: January 9, 2016 01:28 IST

येत्या १० जानेवारीस गोंडपिंपरी नगर पंचायतीची सार्वत्रिक निवडणूक पार पडणार असून या निवडणुकीत गोंडपिंपरी वासियांनी भाजपाला स्पष्ट बहुमत दिल्यास ...

सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन : गोंडपिंपरीत जाहीर सभागोंडपिंपरी : येत्या १० जानेवारीस गोंडपिंपरी नगर पंचायतीची सार्वत्रिक निवडणूक पार पडणार असून या निवडणुकीत गोंडपिंपरी वासियांनी भाजपाला स्पष्ट बहुमत दिल्यास शहराला स्मार्ट सिटी बनवू सोबतच पहिल्याच टप्प्यात १० कोटींचा विकास निधी देवून संपूर्ण राज्यात पोंभूर्ण्यासह गोंडपिंपरी नगरपंचायतीला आदर्श नगरपंचायत करु, असे आश्वासन राज्याचे अर्थ, नियोजन, वने तथा जिल्हा पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहे. येथील नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित प्रचार सभेत मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते.कार्यक्रमाप्रसंगी प्रामुख्याने राजुरा क्षेत्र आमदार अ‍ॅड. संजय धोटे, भाजपा ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, देवराव भोंगळे, राहुल सराफ, हरिश शर्मा, राजू घरोटे, प्रमोद कडू, सतीश धोटे, सुरेश धोटे, बबन निकोडे, दीपक बोनगीरवार, सुहास माडूरवार, नरेंद्र इंगोले तथा पक्षातर्फे १७ ही प्रभागात उभे असलेले उमेदवार प्रामुख्याने उपस्थित होते.शहराच्या विकासाबाबत बोलताना ना. मुनगंटीवार म्हणाले, गोंडपिंपरी शहरवासीयांचा मी ऋणी असून शहरातील मुलभूत गरजांपैकी रस्ते, नाली, वीज, पाणी, घरकूल आदी सुविधा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचविणार. त्याचबरोबरच दारिद्रय रेषेखालील भूमीहिनांना ५० हजारापर्यंत अर्थसहाय्य करुन त्या जागेवर घरकुलांची उभारणी होण्यासाठी शासनाने नुकतेच निर्णय घेतले आहेत. तसेच जिल्ह्यातील दारुबंदीबाबत बोलताना ते म्हणाले, रात्र आहे तर रावणही आहे. दारुबंदी केल्यापासून जिल्ह्यातील गुन्ह्यात घट झाली असून अपघातही कमी झाले आहे. तर दारुबंदी जिल्ह्यात काही लाचखोर व दृष्ट प्रवृत्तीच्या समाजकंटकांनी अवैध विक्रीस चालना दिल्यामुळे विषारी व बनावट दारुची आयात होत असून आगामी काळात दारुबंदीची शिस्त घालण्यासाठी आपण महिल्यांच्या समित्या नेमणार असून दारु विक्रीला खतपाणी घालणाऱ्या अधिकाऱ्यांची खैर करणार नाही, असे म्हणत पोलीस विभागाच्याही कानपिचक्या घेतल्या.तर क्षेत्र आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांनी भाजपा उमेदवारांंना स्पष्ट बहुमताने निवडून देण्याचे आवाहन उपस्थितांना केले. प्रास्ताविक भाजपा जिल्हा सचिव बबन निकोडे, संचालन अमोल कडूकर तर आभार रविंद्र पावडे यांनी मानले. कार्यक्रमास हजारोंची उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)