शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
5
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
6
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
7
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
8
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
9
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
11
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
12
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
13
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
14
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
15
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
16
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
17
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
18
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
19
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
20
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर शहरातील संडे मार्केट पुन्हा सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:19 IST

चंद्रपूर : शहरात अनेक वर्षांपासून संडे मार्केट भरतो. परंतु, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लॉकडाऊनमुळे संडे मार्केट बंद झाला. राज्य सरकारने ...

चंद्रपूर : शहरात अनेक वर्षांपासून संडे मार्केट भरतो. परंतु, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लॉकडाऊनमुळे संडे मार्केट बंद झाला. राज्य सरकारने अनलॉकची प्रक्रिया सुरू केली, तरी संडे मार्केटमधील व्यावसायिकांना व्यवसाय सुरू करण्याची परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे संडे मार्केटमध्ये दुकाने थाटणाऱ्या २०० लोकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता.

गुरुवारी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सचिव नम्रता आचार्य ठेमस्कर यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेत आपल्या समस्या मांडल्या. पालकमंत्र्यांनी मनपा आयुक्तांना संडे मार्केटमधील व्यावसायिकांना दुकाने थाटण्याची परवानगी द्यावी, अशा सूचना दिल्या. त्यामुळे संडे मार्केटचा प्रश्न सुटला असून, रविवारपासून संडे मार्केट सुरू होणार आहे. निवेदन देताना समिस्ता समारुद्दीन फारुकी, महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा सुनीता धोटे, सामाजिक कार्यकर्ते मतीन कुरेशी, ब्लॉक अध्यक्ष शीतल काटकर, उपाध्यक्ष हर्षा चांदेकर, लता बारापात्रे, मंजू भारती, किरण वानखेडे, कांचन रसाड, कविता मेश्राम, पल्लवी वानखेडे, संगीता बोरकर, रेणू सोनटक्के, सबिया पठाण, मंजू झाडे आदी उपस्थित होते.