शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

न्याय न मिळाल्याने आत्महत्येचा प्रयत्न

By admin | Updated: March 7, 2016 00:45 IST

मागील ४० वर्षापासून शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून शेती करणाऱ्या एका आदिवासी शेतकऱ्याला न्यायालयाच्या निर्णयानंतरही न्याय मिळाला नाही.

वरोरा : मागील ४० वर्षापासून शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून शेती करणाऱ्या एका आदिवासी शेतकऱ्याला न्यायालयाच्या निर्णयानंतरही न्याय मिळाला नाही. महसूल विभागाचे उंबरठे झिजवून न्याय न मिळाल्याने त्याचा भ्रमनिराश झाला. परिणामी त्याने शनिवारी रेल्वेरुळावर आत्महत्येचा प्रयत्न केला. काँग्रेसचे शहराध्यक्ष छोटूभाई जैरुद्दीन यांना यासंदर्भात माहिती मिळताच त्यांनी कार्यकर्त्यासह घटनास्थळ गाठून शेतकऱ्याला आत्महत्येपासून वाचविले.वरोरा तालुक्यातील वडगाव येथील श्रावण अजाबराव मडावी हे १९७० पासून भूमापन क्र. ५४ वडगाव तलाठी साझा क्र. ५ मधील १.८७ हेक्टर शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून शेती करीत आहे. अशा जबरानजोत शेतकऱ्यांना पट्टे देण्यासंदर्भात २०१२ मध्ये शासनाने निर्णय घेतला. जमिनीचा पट्टा मिळावा म्हणून २००३ पासून त्यांचा लढा सुरू होता. मडावी यांना शासनाच्या निर्णयामुळे आधार मिळाला व जुलै २००३ रोजी न्यायालयाने मडावी यांच्या बाजूने निर्णय दिला. यानंतर मडावी यांनी मार्च २००६ मध्ये अपील घेतली. यावर १७ सप्टेंबर २०१३ रोजी जिल्हासत्र न्यायाधीश वर्ग १ वरोरा यांनी आदेश पारित केले. जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी याबाबत सकारात्मक धोरण अवलंबविले आणि वरोरा उपविभागीय अधिकाऱ्यांना कार्यवाहीसाठी पत्र दिले. परंतु यानंतरही श्रावण मडावी यांना न्याय मिळाला नाही. २४ सप्टेंबर २०१५ रोजीच्या एका पत्रान्वये अंतिम निर्णय देताना मडावी यांच्या दाव्यात त्रुटी दाखवून वनहक्क समिती उपविभाग वरोरा तथा उपविभागीय वरोरा यांनी दावा फेटाळून लावला. यात दाखविलेल्या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी श्रावण मडावी यांनी अनेकदा तलाठी कार्यालय तसेच तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजविले. परंतु, संबंधित तलाठी व अधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही. परिणामी भ्रमनिरास झालेल्या श्रावण मडावी यांनी शनिवारी वरोरा येथील बोर्डा चौकाजवळील रेल्वेरूळावर दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येताच काही नागरिकांनी याची सूचना नगरसेवक छोटूभाई जैनुद्दीन यांना दिली. त्यानी लगेच कार्यकर्त्यांसह घटनास्थळ गाठून श्रावण मडावी यांनी आत्महत्येपासून वाचविले. (तालुका प्रतिनिधी)