शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दुपारपाळीच्या शाळांचे वेळापत्रक बदलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2016 01:00 IST

सध्या चंद्रपूर जिल्ह्याचे तापमान ४५ अंशावर पोहोचले आहे. मात्र जिल्ह्यातील अनेक शाळा, कॉन्व्हेंट व्यवस्थापन ...

तीव्र उन्हाचा फटका : जिल्हा परिषद आज काढणार आदेशचंद्रपूर : सध्या चंद्रपूर जिल्ह्याचे तापमान ४५ अंशावर पोहोचले आहे. मात्र जिल्ह्यातील अनेक शाळा, कॉन्व्हेंट व्यवस्थापन केवळ अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या नावावर भर उन्हात शाळा भरवित असल्याचे दिसून येत आहे. हा मुद्दा गुरूवारी पार पडलेल्या जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या सभेत गाजला. त्यामुळे शाळा, कॉन्व्हेंचे वेळापत्रक बदलवून सकाळी ७.३० ते १०.३० या वेळात शाळा भरविण्याचा आदेश शिक्षण विभाग शुक्रवारी काढणार आहे.जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव, शांताराम चौखे आणि ब्रिजभूषण पाझारे यांनी शाळांच्या वेळाबाबत प्रश्न उपस्थित करून शिक्षण विभागाला चाांगेलच धारेवर धरले. विदर्भात सर्वाधिक तापमानाचा जिल्हा म्हणून चंद्रपूर जिल्ह्याला ओळखले जाते. येथील तापमान दुपारच्या सुमारास ४५ अंश सेल्सीअस पर्यंत असते. त्यामुळे दुपारी घराबाहेर पडणे धोक्याचे ठरत असून आतापर्यंत जिल्ह्यात चार जणांचा उष्मघाताने मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे अनेक नागरिक दुपारी घराबाहेर पडण्यास घाबरतात. मात्र एवढ्या तीव्र उन्हातही चंद्रपूर शहर व जिल्ह्यातील अनेक शाळा, कॉन्व्हेंट भरविले जात आहेत. यामागे केवळ अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा व्यवस्थापनाचा प्रयत्न आहे. त्यामुळे भर उन्हातही विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागत आहे. उन्हाचा पारा वाढल्याने शेजारच्या तेलंगाना व आंध्र प्रदेशात शाळांना सुट्ट्या लागल्या आहेत. मात्र चंद्रपूर जिल्ह्यात परिस्थती वेगळी असून अद्यापही शाळांना सुट्ट्या लागल्या नाही. त्यामुळे जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव, शांताराम चौखे, आणि ब्रिजभुषण पाझारे यांनी जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या सभेत हा विषय लावून धरत शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. दुपारी भरविण्यात येणाऱ्या शाळांचे वेळापत्रक बदलवून सकाळच्या सत्रात वर्ग घेण्याची मागणी या सदस्यांनी केली. त्यामुळे शाळा, कॉन्व्हेंटचे वेळापत्रक सकाळी ७.३० ते १०.३० या वेळात करण्यात येणार आहे. तसा आदेश शुक्रवारी शिक्षण विभागाकडून काढण्यात येणार आहे. गुरूवारी पार पडलेल्या शिक्षण समितीच्या सभेला जिल्हा परिषद शिक्षण सभापती देवराव भोंगळे, शिक्षण विभागाचे अधिकारी, शिक्षण समितीचे सदस्य, कर्मचारी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)