शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

उपविभागीय अधिकाऱ्याचे पत्र माणिकगडच्या व्यवस्थापनाकडून बेदखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 01:20 IST

मागील ३५ वर्षांपासून माणिकगड सिमेंट कंपनीच्या विरोधात लढा देणारे कुसुंबी येथील ५० आदिवासी कुटुंब हतबल झाले आहे. कंपनीच्या निष्काळजीपणामुळे आमचे कुटुंब उघड्यावर पडल्याचा आरोप पीडितांनी राजुरा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

ठळक मुद्देदडपशाही : ५० आदिवासी कुटुंब उद्ध्वस्त

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : मागील ३५ वर्षांपासून माणिकगड सिमेंट कंपनीच्या विरोधात लढा देणारे कुसुंबी येथील ५० आदिवासी कुटुंब हतबल झाले आहे. कंपनीच्या निष्काळजीपणामुळे आमचे कुटुंब उघड्यावर पडल्याचा आरोप पीडितांनी राजुरा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. यावेळी कुसुंबी येथील बाबुराव जुमनाके, बाबुराव आत्राम, मनोहर जुमनाके, रामदास मंगाम, भाऊराव कन्नाके, शंकर आत्राम, मारू येडमे, तुळशिराम मेश्राम, मारोती पंधरे, नामदेव उदे आदी उपस्थित होते.राजुराचे उपविभागीय अधिकारी यांनी माणिकगड कंपनी आणि आदिवासी यांच्या सोबत चर्चा करण्यासाठी सभा बोलाविली होती. आदिवासी बांधव उपस्थित झाले. परंतु, कंपनीने अधिकारी आलेच नाही. अधिकाºयांच्या पत्राला कंपनीने केराची टोपली दाखविली. मागील ३५ वर्षापासून दºयाखोºयात राहणाºया आदिवासी बांधवांना मोबदला मिळाला नाही. आजही जमिनीवर आदिवासींचीच नावे आहे. १९४२ पासून पाच मोजण्या झाल्या नाव आदिवासीचे आले. मात्र उत्खनन कंपनी करीत आहे. ३५ वर्षामध्ये विधानसभेत अनेक वेळा प्रश्न उपस्थित झाले. मात्र कोलाम आदिवासींना न्याय मिळू शकला नाही.कुसुंबी गावातील आदिवासी कुटुंबाना विस्थापित अनुदान दिले नाही. तसेच गावाचे पुनर्वसन करण्यात आले नाही. आदिवासीच्या मुलभूत अधिकारांवर गदा आणून कंपनीचे उत्खनन सुरू आहे. याकडे शासनाने लक्ष देऊन न्याय देण्याची मागणी लाभार्थ्यांनी यावेळी केली.माणिकगड कंपनी व्यवस्थापन आदिवासी कुटुंबाची पिळवणूक करीत आहे. आदिवासीच्या न्याय मागण्यांसाठी लढा तीव्र करून आदिवासीची पिळवणूक करणाºयांच्या विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आहे. शासनाने या प्रकरणात लक्ष घालून आदिवासींना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा.- आबीद अली