शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

कौशल्य विकासातून विद्यार्थी घडतो

By admin | Updated: September 14, 2015 00:50 IST

देशात कौशल्य विकास कार्यक्रम मोठ्या प्रमाणात सुरू असून ग्रामीण भागातील विद्यार्थी कौशल्य विकासातून घडतो.

राजुरा : देशात कौशल्य विकास कार्यक्रम मोठ्या प्रमाणात सुरू असून ग्रामीण भागातील विद्यार्थी कौशल्य विकासातून घडतो. त्यामुळे छोटे-छोटे व्यावसायिक अभ्यासक्रम गावागावात सुरू झाल्यास ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकतात, असे प्रतिपादन श्री शिवाजी महाविद्यालयातील एमसीव्हीसी अभ्यासक्रमाच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलताना राजुराच्या नगराध्यक्षा मंगला आत्राम यांनी केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ राजुराचे उपाध्यक्ष दत्तात्रय येगीनवार उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव, शिवाजी महाविद्यालय राजुराचे प्रभारी प्राचार्य वामन उलमाले, कला-महाविद्यालय कोरपनाचे प्राचार्य संभाजी वरकड, इंग्रजी विभाग प्रमुख डॉ.ख्वॉजा मोईनुद्दीन, शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.एच.पी. डोर्लीकर, कृष्णकुमार पोचम, फुलशेतीवर मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक प्रा.दत्ता कुलळर्णी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य वामन उलमाले यांनी केले. संचालन प्रा. रामनंदेश्वर गिरडकर यांनी केले. आभार प्रा.एच.पी. डोर्लीकर यांनी मानले. याप्रसंगी प्रामुख्याने डॉ.भोंगाडे, प्रा. लाटेलवार, प्रा.शेंडे, प्रा.वनिता बारई, प्रा.चापले, प्रा.संतोष देठे, प्रा.राजेश खेराणी, प्रा.भगवान धोंगडे, प्रा.राठोड, एमसीव्हीसी विभागाचे प्रा.संजय ढवस, प्रा.के.डी. येगीनवार, प्रा.बी.यू. बोर्डेवार, प्रा.विकास बल्की, प्रा.डी.सी.महा, उमेश मारशेट्टीवार, लक्ष्मीनारायण तन्नीरवार उपस्थित होते.१५ सप्टेंबरला दुपारी १२ वाजता नागपूरचे प्रा.संजय पवार, डॉ.संध्या पवार यांचे व्याख्यान, २१ सप्टेंबरला दुपारी १२ वाजता आॅफीस मॅनेजमेंटवर तहसिलदार धर्मेश फुसाटे यांचे मार्गदर्शन, २९ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता शेतकरी मेळावा, १२ आॅक्टोबरला ११.३० वाजता आधुनिक शेतीवर लपविभागीय कृषी अधिकारी नंदकुमार घोडमारे यांचे मार्गदर्शन, १३ आॅक्टोबरला दुपारी १२.३० वाजता ‘मिशन आयएएस’ व्याख्यान, १६ आॅक्टोबरला टाईम मॅनेजमेंटवर प्रा.एच.पी. डोर्लीकर यांचे व्याख्यान हे कार्यक्रम होणार आहेत. (शहर प्रतिनिधी)