शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
3
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
4
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
5
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
6
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
7
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
8
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
9
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
10
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
11
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
12
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
13
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
14
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
15
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
16
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
17
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
18
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
19
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
20
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!

गुरुजी होण्यासाठी विद्यार्थ्यांची नकार घंटा

By admin | Updated: June 29, 2014 23:50 IST

काही वर्षापूर्वी डीएड करून शिक्षकाची सुरक्षित नोकरी मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा असायची. डीएड अभ्यासक्रमासाठी ते लाखो रुपये भरून खासगी अध्यापक विद्यालयांमध्ये प्रवेश घ्यायचे.

चंद्रपूर : काही वर्षापूर्वी डीएड करून शिक्षकाची सुरक्षित नोकरी मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा असायची. डीएड अभ्यासक्रमासाठी ते लाखो रुपये भरून खासगी अध्यापक विद्यालयांमध्ये प्रवेश घ्यायचे. आता मात्र हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. अध्यापक विद्यालय विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी तयार असतानाही त्यांना विद्यार्थी भेटणे कठीण झाले आहे. त्यामुळे याविद्यालयांना आता बंद केल्याशिवाय पर्याय नाही. यामुळे अनेक अध्यापक विद्यालयातील शिक्षकांवर बेरोजगारींची कुऱ्हाड आली आहे.जिल्ह्यात २७ अध्यापक विद्यालय आहे. या विद्यालयांमध्ये तब्बल १ हजार ८२५ एवढी विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता आहे. मात्र यावर्षी १७ जून या अखेरच्या तारखेपर्यंत केवळ २८६ विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केल्याने उर्वरित जागा शिल्लक राहणार आहे.विद्यार्थ्यांना अर्ज नेण्यासाठी त्रास होऊ नये यासाठी यावर्षीपासून प्रत्येक डीएड कॉलेजमध्ये अर्ज विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. तरीही याकडे विद्यार्थ्यांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. जिल्ह्यातून केवळ ३१८ अर्जांची विक्री झाली आहे. यातील २८६ विद्यार्थ्यांना प्रवेश घेतला. त्यामुळे २७ अध्यापक विद्यालयांसाठी आजच्या घडीला केवळ २८६ विद्यार्थी आहे. प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या बघितल्यास केवळ पाच ते सहा विद्यालयाची प्रवेश क्षमता भागू शकते. मात्र उर्वरित विद्यालयाना विद्यार्थी नसल्याचा प्रश्न कायम आहे. एका विद्यालयामध्ये किमान पाच ते सहा शिक्षक असतात. या विद्यार्थी क्षमतेनुसार जिल्ह्यातील २० विद्यालये बंदच्या मार्गावर आहे. त्यामुळे येथील शिक्षकांना बेरोजगारीची वेळ आली आहे.(नगर प्रतिनिधी)