शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थी घडावा

By admin | Updated: September 6, 2014 01:46 IST

प्रत्येकाचे आयुष्य घडविण्यात शिक्षकाची भूमिका महत्वाची असते. एखाद्यावेळेस अधिकाऱ्यांची चूक आपण समजू शकतो.

चंद्रपूर : प्रत्येकाचे आयुष्य घडविण्यात शिक्षकाची भूमिका महत्वाची असते. एखाद्यावेळेस अधिकाऱ्यांची चूक आपण समजू शकतो. मात्र, शिक्षक चुकला तर संपूर्ण पिढीचे नुकसान होते. सध्या स्पर्धा परीक्षेचे युग आहे. ग्रामीण भागातील शिक्षकांनी या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना घडवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले.शैक्षणिक, सामाजिक आणि राष्ट्रीय कार्यात उल्लेखनीय कार्य केलेल्या शिक्षकांचा जिल्हा परिषदेतील कन्नमवार सभागृहात शिक्षक दिनी सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष कुंभरे होते. याप्रसंगी उपाध्यक्ष संदीप गड्डमवार, मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलिल, सभापती अरुण निमजे, ब्रिजभूषण पाझारे, शांताराम चौखे, पार्वता गभणे, संतोष कुंटावार, सभापती हर्षा चांदेकर, सिंधू बारासिंगे, जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत गुरू यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. आदर्श या शब्दाला जपणे व त्याविषयी जागरूक असणे आवश्यक आहे. अनेकांना शिक्षकांनीच घडविले आहेत. त्यांच्याकडून असेच कार्य घडत राहो, असे सांगत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष संदीप गड्डमवार यांनी नावीन्यपूर्ण उपक्रमातून बायामेट्रीक मशीन उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. जिल्ह्यात अनेक शिक्षक आहेत. त्यांच्या हातून चांगले कार्य घडते. मात्र, ते पुरस्कारासाठी अर्ज करीत नाही. पुढीलवर्षी अशा शिक्षकांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशूतोष सलील यांनी सांगितले. त्यानंतर सरोज प्रकाश चांदेकर, भाऊराव ऋषीजी कावळे, श्रावण रामभाऊ गुंडेट्टीवार, घनश्याम बापूजी पाचभाई, कनिराम गोमाजी पवार, हरीश चंद्रभान ससनकर, बबिता नानाजी बोबडे, शुद्धोधन रूमाजी मेश्राम, पंडित रामाजी लोंढे, खुशाल दादाजी पिसे, टिकाराम आत्माराम शेंडे, वामन श्याम साळवे, जीमनादास दादाजी मसराम, निता ओंकार निनावे, बंडू लिलाधर चरपे या १५ शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत पळसगाव, पारडगाव, नंदोरी येथील जिल्हा परिषद शाळांना सन्मानीत करण्यात आले. प्रास्ताविक शिक्षणाधिकारी (प्राथ.) रविकांत देशपांडे यांनी तर आभार उपशिक्षणाधिकारी टेंभुर्णे यांनी मानले. यावेळी शिक्षक व जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)