शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावरील केबल जीवघेणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 22:11 IST

येथील ताडोबा रोड तुकूम परिसरामध्ये मागील काही दिवसांपासून डिव्हायडरच्या अगदी मधोमध नव्याने विद्युत खांब लावण्यात आले आहेत. मात्र जुन्या विद्युत खांबाला लावलेले केबल रस्त्यावरच ठेवण्यात आल्याने संबंधितांचा हा हलगर्जीपणा एखाद्याचा जीव घेऊ शकतो. मात्र याचे कंत्राटदार तसेच महानगरपालिका प्रशासनाला काहीच देणे-घेणे नसल्याचे चित्र आहे. येथील सदर केबल तसेच खांब हटवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देहलगर्जीपणा वाहनधारकांच्या जीवावर बेतणार : महानगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : येथील ताडोबा रोड तुकूम परिसरामध्ये मागील काही दिवसांपासून डिव्हायडरच्या अगदी मधोमध नव्याने विद्युत खांब लावण्यात आले आहेत. मात्र जुन्या विद्युत खांबाला लावलेले केबल रस्त्यावरच ठेवण्यात आल्याने संबंधितांचा हा हलगर्जीपणा एखाद्याचा जीव घेऊ शकतो. मात्र याचे कंत्राटदार तसेच महानगरपालिका प्रशासनाला काहीच देणे-घेणे नसल्याचे चित्र आहे. येथील सदर केबल तसेच खांब हटवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.चंद्रपूर शहरामध्ये मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहे. या विकासकामांमध्ये काही जुन्या वास्तुंचे नव्याने बांधकाम करण्यात येत आहे. त्यातच जुन्या विद्युत खांबाला हटवून चंद्रपूरच्या सौंदर्यात भर पडेल, अशा नव्या स्वरुपातील विद्युत खांब लावण्याचे काम सुरू आहे.काही ठिकाणी पोल लावण्याचे काम पूर्णही झाले आहे. मात्र जुन्या पोलला हटविण्याऐवजी ते त्याच ठिकाणी ठेवण्यात येत असल्याने अपघाताची शक्यता आहे.नवीन इलेक्ट्रीक पोल लावण्यात आल्यानंतर जुने खांब त्याच ठिकाणी उभे करून ठेवण्यात आले असून अडगळीत पडलेले केबलसुद्धा हटविण्यात आले नाही. सदर केबल अगदी रस्त्यावर असल्याने वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महापालिका प्रशासन एखादा मोठा अपघात होण्याची, तर वाट बघत नसेल ना, असा प्रश्न स्थानिकांसह प्रवाशांना पडला आहे.अधिकाऱ्यांचेही दुर्लक्षया रस्त्याने दररोज महापौर, उपमहापौर तसेच महानगरपालिकेचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी दररोज ये-जा करतात. एवढेच नाही तर जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासनातील बहुतांश अधिकारीही याच रस्त्याने जातात मात्र कोणीही या केबलसंदर्भात महापालिका प्रशासनाकडे विचारणा करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.