शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

वादळाचा वीज वितरणला जबर फटका

By admin | Updated: May 1, 2016 00:28 IST

बुधवारी आणि गुरुवारी लागोपाठ दोन दिवस जिल्ह्यातील काही भागाला वादळाने चांगलेच झोडपले.

अनेक गावे ४८ तास अंधारात : खांब वाकले, वीज वाहिन्या तुटल्या, रोहित्रही बिघडलेचंद्रपूर : बुधवारी आणि गुरुवारी लागोपाठ दोन दिवस जिल्ह्यातील काही भागाला वादळाने चांगलेच झोडपले. या वादळामुळे घरे क्षतिग्रस्त होऊन नागरिकांचे अतोनात नुकसान झालेच; सोबत वीज वितरण कंपनीला वादळाचा जबर फटका सहन करावा लागला. केवळ चार तालुक्यातच वीज वितरणचे १४ लाखांहून अधिक नुकसान झाले आहे. अर्थातच याचा फटका नागरिकांनाही सहन करावा लागला. अनेक गावे ४८ तास अंधारात होती. अद्यापही काही गावांचा वीज पुरवठा पूर्ववत झाला नसल्याची माहिती आहे.बुधवारी रात्री जिल्ह्यात अनेक ठिकाणी चक्रीवादळासह पावसाने हजेरी लावली. तर गुरूवारीही चंद्रपूर शहरासह अनेक गावांना चक्रीवादळाचा तडाखा बसला. गुरूवारी रात्रीच्या सुमारास अनेक ठिकाणी चक्रीवादळासह पाऊस झाला. त्यामुळे अनेकांच्या घरांचे छप्परे उडाली. तर वीज कंपनीच्या खांबावर झाडे पडल्याने अनेक ठिकाणी विद्युत तारा तुटल्या. अनेक गावातील वीज रात्रभर गूल होती. या वादळाचा सर्वाधिक फटका चंद्रपूर, बल्लारपूर, वरोरा, राजुरा व ब्रह्मपुरी तालुक्याला बसला. या पाचही तालुक्यातील अनेक गावातील कुटुंबांचे अतोनात नुकसान झाले. राजुरा तालुुक्यातील गोवरी येथे चक्रीवादळाने गावातील बहुतांश घरांचे छप्पर उडाले. अनेक मोठमोठी झाडे उन्मळून पडली. विजेचे खांब तुटल्याने राजुरा-गोवरी मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. गोवरी येथील बंडू बोरकुटे, भास्कर गंधमवार, शंकर गंधमवार, भाऊराव जुनघरी यांचा घरांची छप्परे उडाली तर प्रभाकर जुनघरी, डॉ. वासुदेव लोहे, पैकन बल्की, नवनाथ पाचभाई, रुपेश पाचभाई यांच्या गोठ्यातील टिनाचे पत्रे वाऱ्याच्या जबरदस्त तडाख्यात उडून गेली. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की घराच्या छप्परांचा सांगाडाच ५०० फुटापर्यंत दूर फेकल्या गेला होता. यात अनेकांच्या घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. दोन दिवस झालेल्या वादळाचा नागरिकांना तर फटका बसलाच; शिवाय वीज वितरण कंपनीलाही मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागले. वीज वितरण कंपनीचे जनसंपर्क अधिकारी आनंद कुमरे यांनी दिलेल्या माहितीनुसार चंद्रपूर तालुक्यात उच्चदाबाचे १८ खांब तर ४५ लघुदाबाचे वीज खांब वाकले व तुटले आहेत. चार किलोमीटरपर्यंतची वीज वाहिनी तुटली आहे. यात चार लाख ७८ हजारांचे महावितरणचे नुकसान झाले आहे. बल्लारपूर तालुक्यात उच्चदाबाचे ४३ खांब व लघुदाबाचे ७६ खांब वाकले वा तुटले आहेत. १४ किमीपर्यंतची वीज वाहिनी तुटली असून सहा रोहित्रे नादुरुस्त झाले आहेत. यातून सात लाखांचे नुकसान झाले आहे. वरोरा तालुक्यात उच्चदाबाचा एक खांब व लघुदाबाचे नऊ खांब तुटले आहेत. तीन रोहित्रे नादुरुस्त झाली असून एक किमीपर्यंतची वीज वाहिनीही तुटली आहे. यात ८५ हजारांचे नुकसान झाले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यात लघुदाबाबे ४२ खांब तुटले असून सहा किमीपर्यंतची वीज वाहिनीही तुटली आहे. या तालुक्यातही तीन रोहित्रे नादुरुस्त झाले आहे. (शहर प्रतिनिधी)