शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

दीक्षाभूमीचे व्यापारीकरण थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2016 00:39 IST

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स असोसिएशनच्या वतीने दीक्षाभूमीचे व्यापारीकरण थांबविण्यासंबंधी चंद्रपूर येथील ५८ वकिलांच्या स्वाक्षरीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

वकिलांचे निवेदन : इतिहासाचे माहात्म्य जपाचंद्रपूर: येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स असोसिएशनच्या वतीने दीक्षाभूमीचे व्यापारीकरण थांबविण्यासंबंधी चंद्रपूर येथील ५८ वकिलांच्या स्वाक्षरीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चंद्रपूर येथील दीक्षाभूमीवर १६ आॅक्टोबर १९५६ ला लाखो शोषित व वंचित घटकातील लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. तेव्हापासून दीक्षाभूमी ही संपूर्ण महाराष्ट्रातील व देशातील बौद्ध बांधवाचे श्रद्धास्थान आहे. दीक्षाभूमीवरील व्यवस्थापन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटी, चंद्रपूरकडे आहे. गेल्या काही वर्षांपासून व्यवस्थापन कमिटीने दीक्षाभूमीची पवित्र जागा क्रॉफ्ट मेलासाठी देऊन दीक्षाभूमीचे व्यापारीकण करणे सुरु केले. त्यावर चंद्रपूर शहरातील बौद्ध समाजाने आपला विरोधसुद्धा दर्शविला होता. परंतु व्यवस्थापन कमिटीने यावर्षीसुद्धा बौद्ध समाजाचा व त्यांच्या भावनेचा कोणताही विचार न करता दीक्षाभूमीची पवित्र जागा क्राफ्ट मेलासाठी देऊन दीक्षाभूमीचे व्यापारीकरण करुन त्याचा फक्त नफा कमविण्याचे साधन म्हणून वापर करीत आहे. त्यामुळे चंद्रपूर शहरातील बौद्ध समाजाच्या भावनेला हरताळ फासला जात आहे. नागपूर शहरानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा देण्याकरिता चंद्रपूर शहराची निवड केली. ही संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील बौद्ध समाजाकरिता अभिमानाची गोष्ट आहे. सोबतच त्याचे पावित्र्य राखून ठेवण्याची जबाबदारी जितकी बौद्ध समाजाची आहे तितकीच प्रशासनाचीसुद्धा आहे.प्रशासनाद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी, चंद्रपूर यांना चंद्रपूर दीक्षाभूमीवर असलेला क्राफ्ट मेला त्वरित खाली करण्याची समज देण्यात यावी. तसेच क्राफ्ट मेलाच्या प्रशासकालासुद्धा दीक्षाभूमीवरुन क्राफ्ट मेला त्वरित बंद करुन दीक्षाभूमीची जागा मोकळी करुन देण्यात निर्देश देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. निवेदन देताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स असोसिएशन चंद्रपूरचे अध्यक्ष अ‍ॅड. एन. बी. रामटेके, सचिव अ‍ॅड. पूनमचंद वाकडे, कोषाध्यक्ष अ‍ॅड. एम. पी. तेलंग, वरिष्ठ अधिवक्ता अ‍ॅड. मिलिंद लोहकरे, तसेच अ‍ॅड. ज. वि. खोब्रागडे, अ‍ॅड. ए. जे. आघात, अ‍ॅड. वावरे, अ‍ॅड. गायकवाड, अ‍ॅड. जिलेकर, अ‍ॅड. वैशाली कवाडे, अ‍ॅड. कवाडे, अ‍ॅड. गोंगले, अ‍ॅड. काकडे व पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)