शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

त्या गावात दिसतात दगडांची घरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:27 IST

नीलेश झाडे गोंडपिपरी : प्रत्येक गावाची ओळख काहीतरी खास असते. गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या या गावाची ओळख जरा हटकेच आहे. ...

नीलेश झाडे

गोंडपिपरी : प्रत्येक गावाची ओळख काहीतरी खास असते. गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या या गावाची ओळख जरा हटकेच आहे. होय..! या गावाची ओळख येथे सापडणारा दगड आहे. ‘किरमिरी’ असे या गावाचे नाव. आज विटांनी घरे बांधण्याची फॅशन असतानाही येथील दगडाला मागणी आहे. या गावात बहुतांश घरे दगडांनी बांधलेलीच दिसून येतात.

गोंडपिपरी तालुक्यात येणारे किरमिरी हे गाव वर्धा नदीपात्रापासून काही अंतरावर वसलेले आहे. एकीकडे वर्धा नदी, तर दुसरीकडे डोंगर. गावात ३५० ते ४०० घरे आहेत. लोकसंख्या एक हजार ३००. या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे गावातील ९५ टक्के घरे दगडांनी बांधलेली आहेत. गावाला लागूनच असलेल्या डोंगरात घिसी गोटा मोठ्या प्रमाणात सापडतो. जेव्हा स्लॅबच्या घराची फॅशन नव्हती, तेव्हा येथील दगडांना मोठी मागणी होती. गावातील बहुतांश कुटुंबे डोंगरातील दगड काढण्याचे काम करायचे. दगड काढणे अन्‌ विकणे हाच गावाचा मुख्य व्यवसाय झाला होता. घराच्या बांधकामासाठी गोंडपिंपरी तालुक्यातील बऱ्याच गावांतून ग्राहक येथे गर्दी करायचे. धाबा परिसरातील बहुतांश जुन्या घरांचा पाया किरमिरी येथील दगडांनीच भरलेला आहे. घर बांधकाम असो वा विहीर. दगड किरमिरीचाच असायचा. त्याप्रमाणेच किरमिरी येथील दगडी पाण्याचे टाके प्रसिद्ध होते. या टाक्याला मोठी मागणी होती. लहान आकाराच्या टाक्यापासून ते मोठे टाके येथील गावकरी बनवायचे. आजही अनेक घरांत किरमिरी येथील दगडी टाके दिसतात. टाके बनविण्यासाठी भला मोठा दगड पोखरून काढावा लागत असे. तयार झालेले टाके बैलबंडीने ग्राहकापर्यंत पोहोचविले जायचे.

गावाला लागूनच डोंगर असल्याने या गावातील नागरिकांनी याच दगडाचा वापर घर बांधकामात केला. कवेलूचे घर असो वा स्लॅब. झोपडी असो वा जनावरांचा गोठा. भिंती दगडांच्यांच ठरलेल्या. या गावाची दगडांशी घट्ट मैत्री असली तरी येथील नागरिक मात्र गोड स्वभावाचे आहेत. आज दगडांची घरे फार कमी बांधली जातात. त्यामुळे दगडाला मागणी नाही. त्यामुळे काही गावकरी शेतीकडे वळलेत, तर काही व्यवसाय टाकून बसलेत. काही मजुरी करून उदर्निवाह करीत आहेत. दगडावर पडणारे लोखंडी घन आता धूळखात पडले आहेत. मात्र, गावाची ओळख आजही दगडांचे गाव अशीच आहे.