शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
3
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
4
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
5
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
6
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
7
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
8
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
9
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
10
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
11
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
12
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
13
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
14
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
15
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
16
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
17
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
18
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
19
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
20
प्रतिभा अमेरिकेबाहेर पडते आहे? - वेलकम टू इंडिया!

सायबर गुन्ह्यांपासून दूर राहावे

By admin | Updated: February 26, 2017 00:49 IST

आज विज्ञानामुळे माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात भारताने आघाडी घेतली आहे. त्याबरोबरच सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही फार वाढले आहे.

विकास मुंढे : सायबर क्राईमवर पालक व विद्यार्थ्यांची जनजागृतीचंद्रपूर : आज विज्ञानामुळे माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात भारताने आघाडी घेतली आहे. त्याबरोबरच सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही फार वाढले आहे. अशा गुन्ह्यांची माहिती करून देणे व त्यापासून दूर कसे राहावे, हे सांगणे फार गरजेचे आहे, असे प्रतिपादन सायबर क्राईमचे प्रमुख तथा पोलीस उपनिरीक्षक विकास मुंढे यांनी केले.दृष्टी सामाजिक व शैक्षणिक संस्थेतर्फे ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी पोलीस उपनिरीक्षक मुंढे बोलत होते. त्यांनी दृष्टी संस्थेचे मुले व पालकांसाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल आभार मानले. तसेच मुलांशी व पालकाशी सायबर गुन्ह्यााबद्दल संवाद साधला. त्यांनी असे बरेच उपक्रम पालकासाठी घेण्याची फार गरज असल्याचे म्हटले.सायबर क्राईमचे अधिकारी राहुल यांनी क्लिपिंगद्वारे विद्यार्थ्यांना कोणकोणते गुन्हे घडू शकतात, त्याबाबत समजावून सांगितले. तसेच त्या गुन्ह्यांपासून सावध राहण्यासाठी काय काळजी घ्यायला हवी, याची माहिती दिली.वेगवेगळ्या स्थानिक उदाहरणाद्वारे व्हिडिओ दाखवून मुलांना सायबर गुन्ह्यांची माहिती, त्यापासून बचाव आणि सावधगिरीबद्दल जागृत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पालकानांही त्यांच्या मुलांच्या दैनंदिन हालचालीबद्दल माहिती घेता यावी, आपली मुले नेट किंवा मोबाईलद्वारे काही विघातक गोष्टींकडे ओढले जात आहेत काय, याची पडताळणी करण्याबद्दल माहिती देण्यात आली.प्रास्ताविक संस्थेच्या अध्यक्षा अ‍ॅड. वर्षा जामदार यांनी केले. त्यांनी अनेकवेळा असे गुन्हे नकळतपणे घडत असल्याचे स्पष्ट केले. कारण आपल्याला आपण काही चुक करीत नाही ना, हेसुद्धा कळत नसते. म्हणून प्रत्येक शाळेत असे कार्यक्रम व्हायला हवे आणि पालक व विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवयाला हवी, असे त्या म्हणाल्या. कार्यक्रमाचे संचालन वंदना धात्रक यांनी केले. तर आभार प्रदर्शन सचिव अ‍ॅड. विद्या मसादे यांनी केले. कार्यक्रम आयोजनात संस्थेच्या मुग्धा कानगे, सारिका बोराडे, अ‍ॅड. निमिषा, उषा मसादे, रोहिणी साखरकर, सविता बेले यांनी मदत केली. (प्रतिनिधी)