शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

महिलांच्या प्रयत्नांतून साकारला गाडगेबाबांचा पुतळा

By admin | Updated: March 8, 2016 00:40 IST

गावात सगळेच शेतकरी, मजूर. यातही एकमेकांच्या कामाला धावून जाण्याची त्यांची नेहमीचीच सहकार्याची भावना.

गावात उभारले वाचनालय : पथनाट्यातून समाजप्रबोधन

महिला दिन विशेषरत्नाकर चटप  नांदाफाटागावात सगळेच शेतकरी, मजूर. यातही एकमेकांच्या कामाला धावून जाण्याची त्यांची नेहमीचीच सहकार्याची भावना. गावात राष्ट्रसंत तुकडोजी महराजांची नित्याची सामुदायिक प्रार्थना आणि याच ग्रामगीतेतून येथील महिलांना समाजप्रबोधनाची प्रेरणा मिळाली. कोरपना तालुक्यातील बाखर्डी गावातील ४० महिलांनी एकत्र येऊन गेल्या ८ मार्च रोजी कलापथकाची स्थापना केली. काही गावातून इच्छुकांनी दिलेल्या आर्थिक मदतीतून या महिलांनी गाडगेबाबांचे विचार सर्वांपर्यंत पोहचावे, यासाठी गावातील मुख्य चौकात कर्मयोगी गाडगेबाबांचा आकर्षक पुतळा उभारला आहे. गावागावांत जाऊन कलापथक सादर करायचे. शेतकरी आत्महत्या, भ्रूणहत्या, हुंडाबळी, अंधश्रद्धा, बालविवाह, आरोग्यविषयक समस्या, व्यसनमुक्ती आदी २१ विषयांवर तीन तासाचे पथनाट्य या महिला आजही सादर करीत आहे. वर्षभरात ३० हून अधिक गावांमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, यातील बहुतांश महिला कलाकार या अशिक्षित तर काहींचे शिक्षण केवळ चौथीपर्यंतच झाले आहे. अशाही परिस्थितीत त्यांच्या अभिनयाने सारेच कौतुकाची थाप देतात. एकही पुरुष नसलेल्या त्यांच्या नाटकात स्त्रियाच पुरुषांचा अभिनय सादर करुन वास्तविक परिस्थितीची जाण करुन देत आहे. या महिलांनी आता नारीशक्ती जनजागृती मंडळ स्थापन केले आहे. गावात दर शनिवारी ग्रामस्वच्छता करुन महिला गाव स्वच्छ करीत आहे. ही परंपरा गेल्या अनेक दिवसापासून आजही सुरु आहे. गावातील जिल्हा परिषद हायस्कूल येथे दरवर्षी मे महिन्यात बालसुसंस्कार शिबिराचे गुरुदेव सेवा मंडळ व राष्ट्रधर्म प्रचार समिती कोरपनाच्या वतीने आयोजन केल्या जाते. यातही या महिला नि:शुल्क योगदान देतात. गावात पथनाट्य सादर केल्यानंतर आर्थिक मदतीतून मिळालेल्या पैशातून आता वाचनालय उभारले आहे. यामुळे गावातील लहान मुले व युवकांना वाचनाची गोडी निर्माण होत असल्याचे महिलांचे म्हणणे आहे. याचबरोबर बचत गट, सामाजिक संस्थाच्या माध्यमातून कुटीर व लघुउद्योगाला चालना देऊन गावातच रोजगार मिळेल, यासाठी आता महिला प्रयत्न करीत असल्याचे दिसते.