शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
3
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
4
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
5
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
6
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
7
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
8
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
9
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
10
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
11
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
12
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
13
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
14
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
15
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
16
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
18
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
19
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
20
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

नगरपालिका निवडणुकीसाठी आजपासून प्रक्रिया सुरू

By admin | Updated: October 24, 2016 00:52 IST

राज्य निवडणूक आयोगाने नगरपालिका निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून २४ आॅक्टोंबरपासून या प्रक्रियेला प्रारंभ होत आहे.

चार नगरपरिषद, एक नगरपंचायत : निवडणुकीचा कार्यक्रम जाहीरचंद्रपूर : राज्य निवडणूक आयोगाने नगरपालिका निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून २४ आॅक्टोंबरपासून या प्रक्रियेला प्रारंभ होत आहे. जिल्ह्यातील वरोरा, राजुरा, बल्लारपूर व मूल या चार नगरपालिकांसाठी व सिंदेवाही या नगरपंचायतीसाठी २७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीमध्ये संगणक प्रणालीद्वारे नामनिर्देशनपत्र व शपथपत्रे स्वीकारण्यात येणार असून विहित मुदतीत नामनिर्देशनाची प्रत संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे सादर करावे लागणार आहे. आरक्षित जागेवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्र किंवा जात पडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जाची पोच जोडावी व निवडून आल्यापासून सहा महिन्याच्या कालावधीत जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. निवडणूक कालावधीत नगरपालिका क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली असल्याने नागरिक व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे, तसेच नगरपरिषद, नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यास जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)जिल्हास्तरावर तक्रार निवारण केंद्र मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर तक्रार निवारण केंद्राची निर्मिती करण्यात येत आहे. तसेच व्ही.एस.टी. चेकपोस्ट पथक व भरारी पथकाची नियुक्ती करण्यात येणार आहे.असा आहे निवडणूक कार्यक्रमनामनिर्देशन पत्र स्वीकारणे - २४ ते २९ आॅक्टोबरपर्यंत. नामनिर्देशनपत्राची छाणनी व वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे २ नोव्हेंबर, नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची अंतिम तारीख ११ नोव्हेंबर, मतदान २७ नोव्हेंबर सकाळी ७.३० ते सायं. ५.३० पर्यंत, मतमोजणी व निकाल जाहीर २८ नोव्हेंबरला सकाळी १० वाजतापासून.