शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

खासगी व्यवस्थापनातील कर्मचारी भरती आता केंद्रीय परीक्षा पद्धतीने

By admin | Updated: September 9, 2015 00:58 IST

राज्यात खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील सर्व शिक्षकांच्या रिक्त जागा भरतीपूर्व केंद्रीय निवड परीक्षा पद्धतीने भरण्यात याव्या, ....

घनश्याम नवघडे  नागभीडराज्यात खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील सर्व शिक्षकांच्या रिक्त जागा भरतीपूर्व केंद्रीय निवड परीक्षा पद्धतीने भरण्यात याव्या, असे निर्देश महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिक्षण विभागाच्या संचालकांना दिले आहेत. या प्रकाराने खासगी व्यवस्थापन वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सर्व शासकीय अधिकाऱ्यांना केआरएद्वारे आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी एक कृती कार्यक्रम आखून दिला आहे. या कृती कार्यक्रमात खासगी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची भरती हा सुद्धा विषय आहे. या विषयाच्या अनुषंगाने ही पद्धत कशी राबवायची, याच्या काही मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनांनुसार रिक्त पदासाठी आॅनलाईन अर्ज मागविणे, प्रश्नपत्रिका तयार करणे, लेखी परीक्षा घेणे, पेपर तपासणी, मुलाखती घेणे व निकाल जाहीर करणे या त्या मार्गदर्शक सूचना आहेत. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी या विभागाने एक कालमर्यादा विहीत केली असून ही कामे १० आॅक्टोबर ते १५ जानेवारी २०१६ या कालावधीत पार पाडावयाची आहेत.खासगी संस्थेद्वारा चालविण्यात येणाऱ्या अनुदानीत व विनाअनुदानीत प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांची माहिती १५ सप्टेंबरपर्यंत कळवावी, असे महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेने म्हटले आहे. ही माहिती सादर करताना शासनमान्य अनुदानीत व विनाअनुदानीत पदे विचारात घ्यावीत अशाही सूचना दिल्या आहेत. या पदांमधील रिक्त पदे भरताना शासनाने विहीत केलेली पटसंख्या, आरक्षण व इतर निकष विचारात घ्यावेत. अतिरिक्त शिक्षकांचाही विचार करण्यात यावा, जेणेकरुन अनावश्यक पद भरती होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आल्या आहेत.