शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

रोगनिदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

By admin | Updated: April 27, 2016 00:51 IST

राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत लोकमत व आरोग्य सेवा चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दुर्गम व आदिवासी म्हणून

गडचांदूर : राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत लोकमत व आरोग्य सेवा चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दुर्गम व आदिवासी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोरपना व जिवती तालुक्यातील रुग्णांसाठी नि:शुल्क आरोग्य तपासणी व रोगनिदान शिबिराचे आयोजन मंगळवारला पार पडले. गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात पार पडलेल्या या शिबिराचा एकूण ३४० गरीब रुग्णांनी लाभ घेतला.मंगळवारला सकाळी ११ वाजता शिबिराचे उद्घाटन आमदार संजय धोटे यांच्या हस्ते पार पडले. अध्यक्षस्थानी प्रभारी शल्य चिकित्सक डॉ. जी.एल. दुधे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती तथा विद्यमान जि.प. सदस्य अरुण निमजे, स्थानिक तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. के.जी. कोरडे, डॉ. रजिया पारेख, डॉ. शाशांक दूरशेटवार, डॉ. वनकर, डॉ. शालिनी तरोने, सखी मंच संयोजिका तथा नगरसेविका कल्पना निमजे, नगरसेविका विजयालक्ष्मी डोहे, अनंतराव चटप, शिवाजी सेलोकर, आबिद अली, लोकमतचे सहायक शाखा व्यवस्थापक विनोद बुले, लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी गोपालकृष्ण मांडवकर प्रामुख्याने उपस्थित होते. शिबिरात रक्तदाब, सिकलसेल, कर्करोग, मधुमेह, गर्भवती माता तपासणी, एका वषार्खालील रुग्णांची तपासणी, ३० वर्षावरील सर्व रुग्णांची नि:शुल्क तपासणी, डोळ्यांचे आजार, त्वचा रोग व इतर आजारांची तपासणी करून निदान करण्यात आले. चंद्रपूरहून राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत डॉक्टरांचे पथक रोगनिदान करण्यासाठी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन लोकमतचे तालुका प्रतिनिधी आशिष देरकर यांनी केले. प्रास्ताविक जिल्हा प्रतिनिधी गोपालकृष्ण मांडवकर यांनी केले तर आभार बाखर्डी वार्ताहर उमेश राजूरकर यांनी मानले.वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत डॉ. रवी बन्सोड, डॉ. कुरेशी, डॉ. प्रीती वलके, डॉ. जुबेर, डॉ. टेकाम, डॉ. सहारे, डॉ. स्वप्नील टेंभे, डॉ. वनकर, डॉ. अरविंद पोवळे, डॉ. सरला रंगारी आदींनी रुग्णांची तपासणी केली. यशस्वीतेसाठी कोरपना शहर प्रतिनिधी मनोज गोरे, लोकेश कोडापे, वैभव हेपट, गोलू धोंगडे, संदीप आरके, सखी मंचच्या सदस्या विजया नामेवार, चंद्रकला राठोड, इंदिरा पाचभाई, कल्पना वरारकर, पुष्पा कोटनाके, वर्षा देरकर, अंबुजा फाऊंडेशनच्या सरोज अंबागडे, पेनसे सिस्टर, ठाकरे सिस्टर, स्वारस्कर सिस्टर, सोयाम सिस्टर, माया आरके आदींनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)