शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

एस.पी. विधी महाविद्यालयात विधी संशोधन पद्धतीवर कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2016 01:06 IST

शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयातील आंतरिक गुणवत्ता निश्चित समिती आणि उच्च शिक्षण व संशोधन केंद्र ...

चंद्रपूर : शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयातील आंतरिक गुणवत्ता निश्चित समिती आणि उच्च शिक्षण व संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. नागपूर विद्यापिठाचे पदव्यूत्तर विभाग प्रमुख प्रा. डॉ. शिरीष देशपांडे कार्यशाळेला प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. प्राचार्य डॉ. अंजली हस्तक यांच्या अध्यक्षतेखाली ही कार्यशाळा पार पडली. रातुम नागपूर विद्यापीठातील डॉ. पायल ठावरी व प्रा. सचिन त्रिपाठी यांचे कार्यशाळेला मार्गदर्शन लाभले.डॉ. शिरीष देशपांडे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सैधांतिक संशोधन पद्धती तसेच प्रयोगसिद्ध संशोधन पद्धती यांचे तुलनात्मक महत्व विषद करून दोन्ही संशोधन पद्धती, विविध समस्यांचे निराकरण करण्याच्या महत्वपूर्ण पध्दती आहेत, असे सांगीतले. संशोधकांनी संशोधन कार्याची निवड करताना समस्येचे निराकरण करण्यासाठी योग्य अशा संशोधन पद्धतीची निवड करून परिणामकारक उपाययोजना शोधून काढण्याचे कार्य करावे, असे डॉ. देशपांडे यांनी आवाहन केले.डॉ. पायल ठावरी यांनी संगणकीय तंत्राचा वापर करून समाजिक विधी संशोधन पद्धती विषयक सादरीकरण केले.कायदा व नियम हे समाजातील प्रत्येक घटक, चाली-रिती यांच्याशी संलग्नीत असल्यामुळे कोणत्याही सामाजिक समस्येची सोडवणूक ही विविध कायद्याचा संशोधकीय अभ्यास करून परिणामकारकरित्या सोडविल्या जाऊ शकते, असे डॉ. ठावरी यांनी सांगितले. संशोधकाने संशोधनाचा विषय, त्याची उद्दिष्टे, संशोधनाचे स्वरूप व व्याप्ती, गृहीतके, संशोधन पद्धती आदी कशा पद्धतीने निवडाव्या, या विषयी सखोल मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात प्रा. सचिन त्रिपाठी यांनी संशोधनाचे प्राथमिक व दुय्यम स्त्रोत यांचा वापर करताना संशोधकाने प्रत्येक स्त्रोत ज्या माध्यमातून स्वीकारला आहे, त्याचा योग्य उल्लेख कशा पद्धतीने करावा, विषय सूची, संदर्भ सुची सैधांतिकरित्या कशा पद्धतीने तयार करावी, या विषयी सादरीकरण केले. संशोधकांनी संदर्भसुची तयार करण्याच्या नवीन पद्धतीचा सराव करूनच आदर्श अशी संदर्भसुची आपल्या संशोधन अहवालात नमुद करावी, असे डॉ. त्रिपाठी यांनी सांगितले. प्राचार्य डॉ. अंजली हस्तक यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात कार्यशाळा आयोजित करण्यामागची भूमिका विषद करून सुनियोजित पद्धतीने संशोधन कसे करावे, या विषयी प्रमुख वक्त्यांनी मार्गदर्शन करावे, असे सांगितले. महाविद्यालयातील पदव्युत्तर विभाग व उच्च शिक्षण व संशोधन केंद्रामार्फत ही कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल कौतुक केले. डॉ. पंकज काकडे यांनी संचालन केले. तसेच प्रा. अश्विनी बल्की यांनी आभार मानले. पदव्यूत्तर विभाग प्रमुख डॉ. आय.जे. राव यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. एस.के. दत्ता, डॉ. पूर्णेदू कार यांनी कार्यशाळेसाठी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)