शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटनासाठी सोमनाथला प्रवेशद्वाराची उणीव

By admin | Updated: April 5, 2015 01:33 IST

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पासाठी पर्यटकांना मूलवरून जवळपास कोणतेही प्रवेशद्वार नाही.

मारोडा : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पासाठी पर्यटकांना मूलवरून जवळपास कोणतेही प्रवेशद्वार नाही. सोमनाथ व सोमनाथ प्रकल्पास भेट देणाऱ्या देशी व विदेशी पर्यटकांसाठी सोमनाथवरून प्रवेशद्वाराची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी पर्यटकांकडून केली जात आहे. ‘पिकते तेथे विकत नाही व विकते तेथे पिकत नाही’ अशी सोमनाथ पर्यटकांची व परिसरातील नागरिकांची अवस्था झालेली आहे. दरवर्षी सोमनाथ येथे पर्यटनस्थळ म्हणून हजारोच्या संख्येने पर्यटक येत असतात. समाजसेवक बाबा आमटे यांनी निर्माण केलेल्या सोमनाथ प्रकल्पाला भेट देणारे देशी-विदेशी पर्यटक आहेत. विदर्भातील शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी व शिक्षक पर्यटक म्हणून येथे भेटी देतात. गडचिरोली जिल्ह्यातील शेकडो पर्यटक सोमनाथला येतात. परंतु त्यांना संलग्न आदिवासी चंद्रपूर जिल्ह्यातील राष्ट्रीय दर्जाचे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात प्रवेश घेता येत नाही. प्राणी दर्शनासाठी ते आसुसलेले असतात. विशेषत: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघाचे हमखास दर्शन होते, असा असा अनुभव असल्याने फार पूर्वी जिल्ह्याच्या ठिकाणावरून जे प्रवेश बनले तेच कायम आहेत. मूलसारख्या मध्यवर्ती भागातून तेथे पोहचायला दोन ते तीन तास लागतात. तसेच सोमनाथला वेगळी व्यवस्था करावयाची गरज नाही. बफर झोन क्षेत्राचे विशेष वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालय मूल येथे आहे. मारोडा येथे क्षेत्र सहाय्यकाचे कार्यालय आहे. येथे लाखो रुपये खर्च करून धर्मशाळा व रिसोर्ट बांधलेले आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष होत आहे. जर प्रवाशांसाठी हे प्रवेशद्वार बनले तर पर्यटनास चालना मिळेल. तसेच सोमनाथ परिसरात अनेकदा व्याघ्रदर्शन होत असते. त्यामुळे प्राणी दर्शकासाठी महत्वाचे ठरेल. त्यामुळे पर्यटन विकास होण्याच्या हेतून सोमनाथ येथून प्रवेशद्वार देण्यात यावे, अशी पर्यटकांची व स्थानिक नागरिकांची मागणी आहे. (वार्ताहर)