शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

‘कुछ तो लोग कहेंगे’ उत्साहात

By admin | Updated: December 6, 2014 22:46 IST

शहरात अनेक कार्यक्रम असतानाही रसिकांच्या उल्लेखनिय अशा उपस्थितीत सृजनचा सलग ६७ वा कार्यक्रम, ‘कुछ तो लोग कहेंगे’ उत्साहाच्या वातावरणात गुरूवारी पार पडला. मुरलीमनोहर व्यास आणि संध्या

सृजनचे आयोजन : शेरो-शायरीची उधळण करीत रंगला कार्यक्रमचंद्रपूर : शहरात अनेक कार्यक्रम असतानाही रसिकांच्या उल्लेखनिय अशा उपस्थितीत सृजनचा सलग ६७ वा कार्यक्रम, ‘कुछ तो लोग कहेंगे’ उत्साहाच्या वातावरणात गुरूवारी पार पडला. मुरलीमनोहर व्यास आणि संध्या विरमलवार हे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. रामायण-महाभारतातील दाखले देत, शेरो शायरीची उधळण करीत व्यासांनी अनेक किस्से सांगत लोकांच्या दुटप्पी मानसिकतेवर बोट ठेवले. कोणी काहीही म्हटले तरी सद्सद्विवेक बुध्दीचा कौल प्रमाण मानत आयुष्यात वाटचाल सुरू ठेवावी, असे सांगत व्यासांनी नवोदिता संस्थेच्या प्रारंभिक दिवसाबद्दल माहिती दिली. त्यावेळी त्यांना आलेले कटू अनुभवही कथन केले. लोक काही ना काही बोलणारच असतात. ‘हाथी चलता है कुत्ते भोंकते है’ या सर्वपरिचित वाक्याचा मथितार्थ त्यांनी यावेळी उलगडवून दाखवला. जग ‘हायवे’ ने जाणारे असते. त्यामुळे ‘मायवे’ ने जाणाऱ्यांना उपेक्षीची वागणूक मिळत असते, असे सांगत संध्या विरमलवारांनी शेवटी ‘मायवे’ ने जाणारेच काहीतरी चारचौघांपेक्षा आगळेवेगळे करून जात असतात, असे सांगितले. मानसशास्त्राचे विविध कंगोरे उलगडवून दाखवित त्यांनी टिका ही अभ्यासपूर्ण असते आणि निंदा ही उथळ आणि बिनबुडाची असते असे सांगत काहीही केले तरी दूषणे देण्याची प्रवृत्ती प्राचीन असल्याचेही सांगितले. चुगली करण्याची प्रवृत्ती अत्यंत घातक असल्याचे सांगत त्यांनी निसर्गाचे आदर्श उदाहरण देत कोणाची उणीदुणी काढणे थांबायला हवे असेही सांगितले. विलास घडसे यांनी यावेळी, कुछ तो लोग कहेंगे हे अमरप्रेममधील किशोरकुमारने गायिलेले गीत गावून वातावरण निर्मिती केली. छबू वैरागडे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन केले. या कार्यक्रमात लोकांच्या विकृत मानसिकतेचे अनेक पैलू उलगडण्यात आलेत. (प्रतिनिधी)