शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

पर्यायी मोटार हाच ‘तपाळ’ वरील उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2017 00:47 IST

गेल्या आठ दिवसांपासून नागभीडला पाणीपुरवठा करणारी तपाळ पाणीपुरवठा योजना बंद आहे.

घनश्याम नवघडे। लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : गेल्या आठ दिवसांपासून नागभीडला पाणीपुरवठा करणारी तपाळ पाणीपुरवठा योजना बंद आहे. तरी तपाळ योजना चालविणारा जि.प.चा पाणीपुरवठा विभाग कुंभकर्णी झोपेतच आहे. जि.प.च्या या वेळकाढू धोरणाबद्दल नागभीडमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या ठिकाणी नियमित पर्यायी मोटर ठेवावी, असेही बोलले जात असून पाणी पुरवठा खंडीत होऊ नये यासाठी हाच पर्याय योग्य आहे. वैनगंगेच्या काठावरील तपाळ गावात ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. म्हणूनच या योजनेला तपाळ हे नाव देण्यात आले. तपाळ ते नागभीड हे अंतर जवळपास ३० किमीचे आहे. मधल्या काळात पाईप लाईनमध्ये समस्या उद्भवत असल्याने पाणीपुरवठा प्रभावीत व्हायचा. पण गेल्या वर्षभरात ही समस्या उद्भवल्याचे ऐकिवात नसले तरी केवळ एका मोटारीमुळे नागभीड व या योजनेतील समाविष्ट गावांना वारंवार पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे, हे वास्तव आहे. दोन महिन्या अगोदर ही योजना अशीच पंधरा दिवस बंद होती. तेव्हा संतप्त नागभीडकरांनी नगर परिषदेवर हल्लाबोल आंदोलन केले होते. एका मोटारीमुळे ही योजना नेहमीच बंद राहते. म्हणून दुसरी एक राखीव मोटार ठेवावी. जेणेकरून एक मोटार बंद पडली की, लगेच दुसरी मोटर लावता येईल व पाणीपुरवठा सुरळीत राहील, अशी आंदोलकांची मागणी होती. उल्लेखनीय बाब ही की, तसे या योजनेत प्रावधानही आहे.यावेळी अतिशय कडेकोट पोलीस बंदोबस्तात नगर परिषदेत आलेल्या तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी आंदोलकांची ही मागणी मान्य केली होती, अशी माहिती आहे. पण दोन महिन्यानंतरही दुसऱ्या मोटारची व्यवस्था करण्यात आली नाही आणि नागभीड व या योजनेत समाविष्ट गावांना परत त्याच समस्येला सामोरे जावे लागले आहे. आता ऐन उन्हाळ्याच्या दिवसात गेल्या आठ दिवसांपासून लोकांना पाणी मिळत नसल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत असला तरी जि.प.चा पाणीपुरवठा विभाग साखर झोपेतच आहे. जेव्हा जेव्हा योजना बंद पडत गेली, तेव्हा तेव्हा सदर प्रतिनिधीने जि.प. च्या पाणीपुरवठा विभागाशी चर्चा केली. मात्र नागभीड नगर परिषदेकडून पाणीपट्टी कराची वसुली नियमित येत नसल्याने आम्ही कामे कशी करायची, असा युक्तीवाद करण्यात येतो. या गोष्टीत तथ्य असले तरी नागभीड नगर परिषदेनेही ज्यांची पाणीपट्टी थकीत असेल त्यांच्यावर कारवाई करावी व पाणीकर भरून जि.प.च्या पाणीपुरवठा विभागाला सहकार्य करावे. अन्यथा ही समस्या उद्भवतच राहील.