शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

घनकचरा प्रकल्पाचे ग्रहण सुटता सुटेना !

By admin | Updated: September 3, 2014 23:15 IST

चंद्रपुरातील महत्त्वाकांक्षी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला लागलेले ग्रहण अनेक वर्षांनंतरही सुटू शकले नाही. घनकचरा प्रकल्पाचे कंत्राट दिल्यानंतर मनपाने जागा दिली नाही म्हणून संबंधित कंत्राटदाराने

मनपा करणार कारवाई : जागा देऊनही कामे ठप्पचंद्रपूर: चंद्रपुरातील महत्त्वाकांक्षी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला लागलेले ग्रहण अनेक वर्षांनंतरही सुटू शकले नाही. घनकचरा प्रकल्पाचे कंत्राट दिल्यानंतर मनपाने जागा दिली नाही म्हणून संबंधित कंत्राटदाराने ११ लोटल्यानंतरही कामाचा शुभारंभ केला नाही. आता मनपाने जागाही उपलब्ध करून दिली. तरीही हे काम रखडलेलेच आहे. त्यामुळे हा प्रकल्प चंद्रपुरात कार्यान्वित होणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. चंद्रपुरात महानगरपालिका अस्तित्वात आली आहे. चंद्रपूर शहर झपाट्याने वाढत असून लोकसंख्याही त्या तुलनेत वाढत आहे. चंद्रपुरातून दररोज १३० ते १४० टन कचरा निघतो. एवढ्या मोठ्या प्रमाणात घनकचरा बाहेर पडत असतानाही चंद्रपुरात आजवर घनकचरा प्रकल्प उभा होऊ शकला नाही. याशिवाय घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाबाबतही चंद्रपूर दुर्देवीच ठरले. चंद्रपूरमध्ये नगरपालिका अस्तित्वात असताना घनकचरा व्यवस्थापनाचे धिंडवडेच उडाले होते. त्यानंतर आता मागील वर्षी नागपूर येथील एका कंपनीला घनकचरा उचलण्याचे कंत्राट देण्यात आले. घनकचरा उचलणे आणि डम्पींग यार्डवर टाकणे एवढेच या कंपनीकडे काम आहे. घनकचरा प्रकल्पासाठी महानगरपालिकेला कधी कंत्राटदारच मिळाला नाही. नगरपालिका अस्तित्वात असतानापासून केवळ निविदा काढण्याचेच काम केले जात होते. कंत्राटदाराकडून प्रतिसाद मिळत नव्हता. दरम्यान दीड वर्षापूर्वी नागपूर येथील मे. कन्यका नॉन कन्व्हेशनल एनर्जी प्रा. लि. या कंपनीला या प्रकल्पासाठी कंत्राट देण्यात आले.विशेष म्हणजे, ४ जून २०१३ रोजी वर्क आर्डरही देण्यात आला. या कामासाठी मनपाकडून २० एकर जागा देण्याचे ठरविण्यात आले. यातील तीन एकर जागा सपाटीकरण करून देण्याचेही ठरले. मात्र मनपाने जागा सपाटीकरण करून दिली नाही, म्हणत ११ महिन्यांपर्यत कामाचा शुभारंभच केला नाही. आता काही महिन्यापूर्वी महानगरपालिकेने संबंधित कंत्राटी कंपनीला जागा सपाटीकरण करून दिली. आता काम धडाक्यात सुरू होऊन प्रकल्प लवकरच कार्यान्वित होईल, अशी अपेक्षा होती. मात्र ही अपेक्षाही फोल ठरत असल्याचे दिसून येत आहे. या प्रकल्पाचे बजेट मोठे असल्याने मे. कन्यका कंपनीने प्रकल्पासाठी लोन केस केली असून अद्याप लोनची रक्कम मिळायची आहे, असे कारण सदर कंपनीकडून सांगण्यात येत आहे. ते काहीही असले तरी प्रकल्पाचे काम अजूनही थंडबस्त्यात आहे. त्यामुळे हा प्रकल्प सध्यातरी चंद्रपूरकरांसाठी मृगजळच ठरला आहे. (शहर प्रतिनिधी)