शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

जामीनदाराचा हृदयविकाराने मृत्यू

By admin | Updated: September 7, 2015 01:20 IST

अवैध दारू विक्रीच्या प्रकरणातील आरोपींचा जामीन घेण्यासाठी आलेल्या जमानतदाराचा येथील न्यायालय परिसरात हृदयविकाराने मृत्यू झाला.

ब्रह्मपुरीतील घटना : उपचारापूर्वीच झाले निधनब्रह्मपुरी : अवैध दारू विक्रीच्या प्रकरणातील आरोपींचा जामीन घेण्यासाठी आलेल्या जमानतदाराचा येथील न्यायालय परिसरात हृदयविकाराने मृत्यू झाला. ही घटना ५ सप्टेंबरला दुपारी घडली.३० आॅगस्टला ब्रह्मपुरी पोलिसांनी अटक केलेल्या अवैध दारू विक्री प्रकरणातील आरोपी व २ सप्टेंबरला अटक करण्यात आलेले अवैध दारू विक्री प्रकरणातील आरोपींनी पवनी (जि. भंडारा) येथून दारू आणली होती, हे चौकशीत स्पष्ट झाले होते. या प्रकरणात पवनी तालुक्यातील गावड येथील देशी दारू दुकानदार अरविंद आसाराम शेंडे याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. त्याच्या जमानतीसाठी आलेले चिचाळा येथील पुरुषोत्तम नंदेश्वरा (४०) यांचा न्यायालय परिसरातच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर ब्रह्मपुरी पोलिसांनी त्यांना उपचारासाठी नेण्याचा प्रयत्न केला. मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. ४ सप्टेंबरच्या मध्यरात्रीच्या सुमारास बी.टी. श्रीवास्तव यांच्यासह काही जागृक नागरिकांनी जिवाची पर्वा न करता ३० पेट्या दारूसह आरोपी स्वप्नील महादेव पाळ व नफूळ ज्ञानेश्वर जवादे यांना पोलिसाच्या स्वाधीन केले. दुसरी घटनेत रमाबाई चौकात १० पेटी देशी दारूसह राहूल प्रकाश मैद याला ब्रह्मपुरी पोलिसांनी अटक केली. दोन्ही अवैध दारूविक्रेत्यांनी पवनी तालुक्यातील गावड येथील देशी दारू दुकानदार अरविंद आसाराम शेंडे यांच्या दुकानातून दारू घेतल्याचे सांगितले. त्यावरून पोलिसांनी शेंडे याला अटक केली. जामिनासाठी शनिवारी त्याला न्यायालयात हजर केले. जामिनदार म्हणून पुरुषोत्तम नंदेश्वर यांना बोलविले होते. पुरूषोत्तम नंदेश्वर न्यायालय परिसरातील झाडाखाली बसून असता त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. लगेच त्यांना उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले असता त्यांचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)