शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपंचमीला सापाला पूजले जाते; मग इतर दिवशी का मारले जाते ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 05:00 IST

चंद्रपूर जिल्ह्यात आढळणाऱ्या सुमारे ३२ सापांपैकी केवळ ६ प्रकारचे साप विषारी आहेत, अशी माहिती वन विभागाच्या अहवालात नमुद आहे. ग्रामीणच नव्हे तर शहरी भागातील नागरिकांतही सापांविषयी अज्ञान असल्याने बऱ्याच बिनविषारी सापांना विनाकारण मारून टाकण्याच्या घटना घडत आहेत. बिनविषारी, निमविषारी व विषारी अशा प्रकारे सापांचे वर्गीकरण केले जाते. 

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : श्रावण महिन्यातील नागपंचमी सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. इतरवेळी साप दिसला तर लगेच ठेचून मारणारे नागपंचमीलासापाची मनोभावे पूजा करतात. नवैद्य दाखवितात. मात्र, शास्त्रीय माहितीचा अभाव व गैरसमजांमुळे सापांच्या विविध प्रजाती नष्ट होत आहे. यंदाच्या नागपंचमीपासून तरी मानवाच्या या मित्राला वाचविण्याचा सर्वांनी संकल्प करावा, असे आवाहन सर्पमित्रांनी केले आहे.चंद्रपूर जिल्ह्यात आढळणाऱ्या सुमारे ३२ सापांपैकी केवळ ६ प्रकारचे साप विषारी आहेत, अशी माहिती वन विभागाच्या अहवालात नमुद आहे. ग्रामीणच नव्हे तर शहरी भागातील नागरिकांतही सापांविषयी अज्ञान असल्याने बऱ्याच बिनविषारी सापांना विनाकारण मारून टाकण्याच्या घटना घडत आहेत. बिनविषारी, निमविषारी व विषारी अशा प्रकारे सापांचे वर्गीकरण केले जाते. बिनविषारी साप चावला तर कोणताही धोका संभवत नाही. निमविषारी साप हे विषारीच असतात; परंतु त्यांच्या दंशामुळे जीव जाईल इतका धोका नसतो. मात्र, विषारी साप प्राणघातक असतो. वन्यजीव संरक्षण संस्था, आरोग्य विभाग व वन विभागाच्या वतीने नागरिकांमध्ये जागृती कार्यक्रम आयोजित केले जातात. मात्र, नागरिकांच्या मनातील गैरसमज अजुनही पूर्णत: दूर झाले नाहीत. शहरी भागातील हा प्रकार घडत असल्याचे अनेक घटनावरून सिध्द झाले आहे. त्यासाठी प्रबोधनाचा रेटा वाढविणे हाच पर्याय असल्याचे सर्पमित्रांचे म्हणणे आहे.

जिल्ह्यात आढणारे सापांचे प्रकार

विषारी : नाग, घोणस, मण्यार, फुरसे, पोवळा, चापडा.बिनविषारी : अजगर, धामण, तस्कर, गवत्या, दिवड, नानेटी, धुळ नागीण, पहाडी तस्कर, कवड्या, पट्टेरी कवड्या, कुकरी, व्हेरिगेटेड कुकरी, वाळा, चंचू वाळा, डुरक्या घोणस, मांडुळ, रूका, खापर खवल्या, ब्लॅक हेडेड (काळतोंड्या).

साप हा तर शेतकऱ्यांचा मित्रसाप हे उंदीर, घूस अशा धान्याचे नुकसान करणाऱ्या प्राण्यांना खातात. त्यामुळे सापाला शेतकऱ्यांचा मित्र म्हटले जाते. सापाला न मारता सर्पमित्रांना बोलावून त्याला जीवदान द्यावे. निसर्गातील अन्नसाखळी कायम ठेवण्यासाठी सापांचे अस्तित्व टिकले पाहिजे.

सर्पमित्र काय म्हणतात...

कोणताही साप जाणीवपूर्वक दंश करीत नाही. स्वत:चा जीव वाचविण्यासाठी साप प्रतिकार करतो. डुख धरणे यासारख्या कल्पना चुकीच्या व अशास्त्रीय आहेत. सापाबद्दल असलेल्या भीतीचा फटका बिनविषारी सापांना बसतो. नागपंचमीनिमित्त सापांची पूजा करण्यापेक्षा त्यांच्याबद्दल शास्त्रीय माहिती घेऊन त्यांना वाचविण्याचा संकल्प केल्यास हा सण अधिक आनंददायी होईल, असे मत चंद्रपूर येथील सर्पमित्र प्रविण कडू यांनी व्यक्त केले.

साप आढळला तर...- साप आढळला तर ठार न मारता सर्पमित्राला तत्काळ बोलवावे. मांत्रिक व अंधश्रद्धेला बळी पडू नये. सर्पमित्र सापाला पकडून त्याच्या मूळ अधिवासात सुरक्षित सोडतात. दंश केलाच तर मानसिकदृष्ट्या खचू नये. त्या व्यक्तीला धीर द्यावा, स्वच्छ आवळपट्टी दंश झालेल्या जागेपासून एक फूट अंतरावर बांधावी. रूग्णाला तात्काळ उपचारासाठी न्यावे. शासकीय रुग्णालयात यावर उपचार मोफत होतो. सर्पदंशावर परिणामकारक औषध फक्त प्रतीसर्पविषच (एएसव्ही) आहे, हे लक्षात ठेवावे, अशी माहिती सर्पमित्र प्रविण कडू यांनी दिली.

 

टॅग्स :snakeसापNag Panchamiनागपंचमी