शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
4
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
5
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
6
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
7
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
8
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
9
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
10
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
11
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
12
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
13
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
14
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
15
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
16
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
17
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
18
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
19
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
20
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरात धुव्वाधार

By admin | Updated: September 6, 2014 23:38 IST

मागील आठवडाभरापासून जिल्ह्यात पावसाने चांगलाच दम आणला. शनिवारी सकाळपासून पावसाची रिपरिप सुरु होती. दरम्यान सायंकाळी ५ वाजतापासून धुवादार पावसाने हजेरी लावल्याने शहरातील

अनेकांच्या घरात पाणी घुसले : वाहनधारकांची तारांबळचंद्रपूर : मागील आठवडाभरापासून जिल्ह्यात पावसाने चांगलाच दम आणला. शनिवारी सकाळपासून पावसाची रिपरिप सुरु होती. दरम्यान सायंकाळी ५ वाजतापासून धुवादार पावसाने हजेरी लावल्याने शहरातील जनजीवन विस्कळीत झाले. अनेकांच्या घरात पाणी घुसल्याचीही माहिती मिळाली आहे.शनिवारी सकाळपासूनच सुर्यनारायणाचे दर्शन झाले नाही. सकाळी ८ वाजताच्या दरम्यान पावसाने हजेरी लावल्यानंतर दिवसभर पावसाची रिपरिप सुरु होती. सायंकाळी तब्बल दोन तास दमदार पाऊस बसरला. यामुळे नाल्या तुडूंब भरून वाहू लागल्या. नाल्यांतील पाणी रस्त्यावर आल्याने चंद्रपूर शहरातील बहुतांश रस्ते जलमय झाले. रस्त्यावरून पाणी असल्याने अनेकांच्या दुचाकी, कारमध्ये पाणी घुसल्याने वाहनधारकांना कमालिचा त्रास सहन करावा लागला. शहरातील आझाद बाग परिसरामध्ये रस्त्यावरून दोन ते अडिच फूट पाणी होते. शहराचा महत्त्वाचा समजल्या जाणाऱ्या या रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक पुर्णपणे विस्कळीत झाली होती. काही वाहनधारक नालीमध्ये पडल्याने जखमी झाले. शहरातील काही रस्त्यांचे बांधकाम करण्यात येत असल्याने नाल्या अडविण्यात आल्या आहेत. याचा फटका नागरिकांना बसला. अनेकांच्या घरात पाणी घुसल्याने मोठे नुकसान झाले आहे. शहरातील घुटकाळा वॉर्ड, जयंत टॉकीज परिसर, आझाद बाग, नगिनाबाग, भिवापूर, बाबूपेठ, समाधीवार्ड आदी परिसरातील रस्त्यांवरून पाणी वाहत होते. इंदिरानगर, कृष्णनगर, बाबुपेठ परिसरातील काही भाग, सिस्टर कॉलनी परिसरातील काही घरांमध्ये पाणी शिरल्याने अनेकांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे.यावर्षीच्या पावसाळ्यामध्ये आजचा पाऊस सर्वाधिक होता. प्रथमच नदी नाले दुथळी भरून वाहत होते. विशेष म्हणजे, इरई नदीची जलपातळी यावेळी प्रथमच वाढली. जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. रोवणीसाठी हा पाऊस ठिक असला तरी कपाशीसाठी धोकादायक ठरू शकतो, असे काही शेतकऱ्यांचे मत आहे. मागीलवर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाचे प्रमाण कमी आहे. अनेक तलाव मागील आठवड्यापर्यंत अर्धेच भरले होते. (नगर प्रतिनिधी)