शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

लघू उद्योगांसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:28 IST

चिमूर : तालुक्यात रोजगाराभिमुख उद्योगांचा अभाव आहे, तर दुसरीकडे बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असल्याचे दिसून येते. उद्योगच नसल्याने युवकांमध्ये ...

चिमूर : तालुक्यात रोजगाराभिमुख उद्योगांचा अभाव आहे, तर दुसरीकडे बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असल्याचे दिसून येते. उद्योगच नसल्याने युवकांमध्ये निराशा पसरत आहेत. शासनाने मुद्रा व अन्य योजनांची घोषणा करून स्वयंरोजगार उभारण्यावर भर देत आहेत. त्यामुळे काही युवक कर्जासाठी बँकांकडे अर्ज सादर करीत आहेत, पण प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप होत आहे.

भरधाव धावणाऱ्या वाहनांकडे दुर्लक्ष

चंद्रपूर: शहरातील अनेक मार्गावर वाहनचालक भरधाव वेगाने वाहने चालवितात. त्यामुळे शहरात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे भरधाव वेगाने वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

केरोसिन मिळत नसल्याने नागरिक त्रस्त

चंद्रपूर : शासनाने चूलमुक्त धोरण अवलंबित केरोसीन देणे बंद केले आहे. यासाठी लाभार्थ्यांना गॅस-सिलिंडरचे वितरणही केले आहे. मात्र, सध्याच्या स्थितीत नागरिकांकडे गॅस सिलिंडर भरणसाठी पैसाच नसल्यामुळे अनेक जण चुलीवरच स्वयंपाक करणे पसंत करीत आहे, तर काही जण केरोसिनची मागणी करीत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात केरोसिनचा पुरवठा करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

शिकवणी क्लास सुरू

करण्याची परवानगी द्या

चंद्रपूर : लॉकडाऊनमध्ये सर्वच बंद झाल्याने खासगी शिवकणी क्लासवरही निर्बंध आले. त्यानंतर अनलॉक करण्यात आले असून, काही निर्बंधही हटविण्यात आले. मात्र, शिकवणी वर्ग अद्यापही सुरू करण्यात आले नसल्याने संचालकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे शिकवणी वर्ग सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

अतिवृष्टीची मदत मिळालीच नाही

मूल : शासनाने जाहीर केलेली अतिवृष्टीची मदत अद्यापही काही शेतकऱ्यांना मिळाली नसल्याने आर्थिक अडचणीला सामोर जावे लागत आहे. काही शेतकरी तहसील कार्यालयात चकरा मारत आहेत. मात्र, कोरोनाचे कामे असल्याचे सांगून वापस पाठविण्यात येत आहे.