शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

कन्नमवारांसारखे कौशल्यप्राप्त विद्यार्थी तयार व्हावेत - मुनगंटीवार

By admin | Updated: January 10, 2015 22:51 IST

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर कर्मवीर मा.सा. उपाख्य दादासाहेब कन्नमवार यांनी उद्योगपतींकडे लक्ष न देता गरिबांचा स्तर उंचावण्याचा प्रयत्न केला. म्हणून ते कर्मवीर झाले. तसेच आपण सुद्धा

मूल : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर कर्मवीर मा.सा. उपाख्य दादासाहेब कन्नमवार यांनी उद्योगपतींकडे लक्ष न देता गरिबांचा स्तर उंचावण्याचा प्रयत्न केला. म्हणून ते कर्मवीर झाले. तसेच आपण सुद्धा आपल्या कर्मावर विश्वास ठेवून कौशल्यप्राप्त करावे व मोठे व्हावे असे मनोगत अर्थ व नियोजन तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.स्व. दादासाहेब कन्नमवार यांच्या जयंतीनिमित्त स्थानिक कर्मवीर महाविद्यालयात ‘शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यास शासनाने शेतकऱ्यांना दिलेले अनुदान उपयुक्त आहे’ या विषयावर आयोजित विद्यापिठस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शिक्षणमहर्षी अ‍ॅड. बाबासाहेब वासाडे होते. यावेळी संस्थेच्या वतीने ना. मुनगंटीवार यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. अ.ह. वानखेडे यांनी तर संस्थेचे सचिव अ‍ॅड. अनिल वैरागडे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी व्यासपिठावर संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. राममोहन बोकारे, अनिल वैरागडे आदी उपस्थित होते.चंद्रपुरातही आदरांजलीकर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांना जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली. आदर्श महिला मंडळाच्या वतीने प्रभा चिलके, भारती नेरलवार, शेफाली कुमरवार, निलीमा कोकुलवार, ममता पुल्लावार, साधना नेरलवार, वर्षा जकुलवार, संगिता चिनेवार, वसंत आकुलवार, मधु घंटावार, जगदिश नेरलवार,राजेश नेरलवार, साचेवार, बत्तुरलवार यांनी जटपुरा परिसरातील कन्नमवार यांच्या पुतळ्याला मार्ल्यापण करून आदरांजली अर्पण केली.