शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय लसीकरणात सहा वर्षीय मुलगी आजारी

By admin | Updated: December 9, 2014 22:47 IST

शासकीय रुग्णालयाच्या चमूने वरोरा येथील खाजगी शाळेत लसीकरण कार्यक्रम घेतला. या लसीकरणानंतर शाळेतील सहा वर्षाची मुलगी आजारी पडली असल्याने आरोग्य यंत्रनेत खळबळ उडाली आहे.

वरोरा : शासकीय रुग्णालयाच्या चमूने वरोरा येथील खाजगी शाळेत लसीकरण कार्यक्रम घेतला. या लसीकरणानंतर शाळेतील सहा वर्षाची मुलगी आजारी पडली असल्याने आरोग्य यंत्रनेत खळबळ उडाली आहे. आजारपणामुळे मुलीचे पालक चिंताग्रस्त असून मुलीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. वरोरा शहरातील खाजगी विद्यालयात धर्नुवात, डांग्या खोकला व घटसर्प हे आजार विद्यार्थ्याना होवू नये म्हणून उपजिल्हा रुग्णालय चमूच्या वतीने लसीकरण करण्यात आले. त्यात १०० विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. लसीकरण झाल्याच्या दोन दिवसानंतर एक सहा वर्षीय विद्यार्थीनी एकदम आजारी पडली. मुलीला मानेचा आजार जडला असून मुलीची मान एक आठवडा लोटूनही सरळ झालेली नाही. तिच्या पालकांने सर्वप्रथम उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे नेवून उपचार केला. तेव्हा लसीकरणातून आजार जडला असल्याचा संशय व्यक्त केला. परंतु, पालकांना उडवाउडवीचे उत्तरे देण्यात आली. ही बाब वरोरा शहरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांना माहित होताच त्यांनी मुलीला व तिच्या पालकांना घेवून उपजिल्हा रुग्णालय गाठून सदर प्रकार वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कानावर टाकला.यावेळी या मुलीवर शासकीय रुग्णालयात उपचार करुन आवश्यकता भासल्यास चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्याचे आश्वासन देत संपूर्ण खर्च शासन करणार असल्याची माहिती दिली. (तालुका प्रतिनिधी)