शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

साहेब! शैक्षणिक धडे शिकवायला गुरुजी येणार का ?

By admin | Updated: July 7, 2015 01:07 IST

मागील वर्षी संत्र संपले. पण शिक्षकांची रिक्त पदे भरण्याचे सौजन्य शिक्षण विभागाने दाखविले नाही...

विद्यार्थी कसे घडतील ? : गुरुजी न आल्यास अनेक शाळांना लागणार कुलूपजिवती: मागील वर्षी संत्र संपले. पण शिक्षकांची रिक्त पदे भरण्याचे सौजन्य शिक्षण विभागाने दाखविले नाही आणि यावर्षीचे सत्र सुरु होऊन आठवडा लोटला तरी पहाडावरील अनेक शाळेला गुरुजी मिळाले नाही. नवीन गुरुजी देण्याच्या शिक्षण विभागाकडून काही हालचालीसुद्धा दिसत नसल्याने पहाडावरील विद्यार्थ्यांना सांभाळताना कार्यरत तुटपुंज्या शिक्षकांना कसरत करावी लागत आहे. असाच एकोप्याने धडे घेण्याचा गंभीर प्रकार काही दिवस चालल्यास पहाडावरील अनेक शाळांना कुलूप लावण्याची वेळ येईल, असे पालकांकडून बोलले जात आहे.ग्रामीण भागातील गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी विभाग जनजागृती करताना दिसत आहे. मात्र शाळेत नियमित येणाऱ्या विद्यार्थ्यांना अजूनही विषयानुसार शिकवायला गुरुजी मिळाला नाही. याकडे मात्र शिक्षण विभागाचा कानाडोळाच झाल्याचे दिसत आहे. लोकमत प्रतिनिधीने पहाडावरील काही शाळांना भेटी दिल्या असता गंभीर प्रकार पहायला मिळाला. कुठे वर्ग ५ तर कुठे वर्ग ७ आणि विविध विषयांना शिकवणारे गुरुजी मात्र दोनच असल्याने शाळेतील गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळली जात असल्याचा प्रकार दिसत आहे. असे असतानाही शिक्षण विभागाला जाग आली नाही. ज्या शाळेतून गुणवत्ताधारक विद्यार्थी घडत होते. आज त्याच शाळेतील वाढती विद्यार्थी संख्या आणि शिक्षकाची रिक्त पदे यामुळे कार्यरत गुरुजींना गुणवत्ताधारक विद्यार्थी घडविताना अपयशी ठरावे लागत आहे. विद्यार्थ्यांना शिकविण्याबरोबरच शिक्षकांना जनगणना, मतदानाचे काम, शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा सर्वे इत्यादी कामामुळे शिक्षकांवर ताण पडत असल्याने शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे.तालुक्यातील देवलागुडा, येल्लारपूर (खु.), मरकलमेंढा, गुडसेला, रायपूर, परमडोली, कमलापूर, आदी गावातील जि.प. शाळेला अद्यापही शैक्षणिक धडे शिकवायला गुरुजी मिळाले नाही. मागील वर्षी अनेक वेळा शिक्षण विभागाकडे गुरुजी द्या, अशी लेखी, तोंडी मागणी केली. मात्र दखल घ्यायला कुणालाही वेळ मिळाला नाही. यावर्षीही सत्राचा आठवडा संपला. मात्र गुरुजींचा पत्ता नाही. शिक्षण विभाग अजून किती दिवस हा तमाशाचा फड चालविणार, असा संतप्त सवाल नागरिकांकडून ऐकायला मिळत आहे. शहरातील विद्यार्थ्यांचा कल दिवसेंदिवस इंग्रजी माध्यमात शिकण्याकडे जात असून ग्रामीण भागात मात्र इंग्रजी माध्यम तर सोडाच पण मराठीचे धडे शिकवायलाही गुरुजी मिळत नसल्याने जिल्हा परिषद शाळेची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालल्याचे दिसत आहे. (तालुका प्रतिनिधी)