शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
5
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
6
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
8
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
9
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
10
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
11
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
12
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
13
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
14
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
15
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
16
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
17
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
18
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
19
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
20
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ‘सिंघम’ अवतरणार; दहाव्या मिनिटाला पोलीस मदत मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:27 IST

दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर केंद्र पातळीवर एक हेल्पलाईन स्थापित करण्याची मागणी होत होती. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांनुसार आपत्कालीन प्रतिसाद साहाय्य प्रणाली ...

दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर केंद्र पातळीवर एक हेल्पलाईन स्थापित करण्याची मागणी होत होती. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांनुसार आपत्कालीन प्रतिसाद साहाय्य प्रणाली (ईआरएसएस) निर्मितीचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार कोणत्याही व्यक्तीला आपत्कालीन परिस्थितीमध्ये तत्काळ मदत हवी असल्यास ११२ नंबरची हेल्पलाईन कार्यान्वित करण्यात आली. यासंदर्भातील सर्व प्रणाली पोलीस कंट्रोल रूममध्ये जोडण्यात आली आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत असलेल्या व्यक्तीने फोन लावल्यावर अवघ्या काही सेकंदात हा फोन कुठून आला, हे कळणार आहे. त्यानंतर तेथील पोलीस नियंत्रण कक्ष, अग्निशमन दल, महिला हेल्पलाईन, चाईल्ड हेल्पलाईन यांना एकाच वेळी सदर कॉलची माहिती दिली जाणार आहे. त्यानुसार घटनेचे गंभीर्य लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार सर्व यंत्रणा घटनास्थळी दाखल होऊन आपत्कालीन परिस्थितीत असलेल्या व्यक्तीला मदत करू शकतील.

जिल्ह्यात एकूण......पोलीस ठाणे आहेत. त्यात १९४ पोलीस अधिकारी व १३९८ अंमलदार कार्यरत आहेत. यापैकी ...... पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यांच्या दिमतीला जिल्हा नियोजनाच्या विकास निधीतून १५ अद्यावत वाहने देण्यात आली आहेत. यासोबत निधी आल्यानंतर पुन्हा काही चारचाकी व दुकाही वाहने खरेदी करण्यात येणार आहेत. ही वाहने प्रत्येक तालुका मुख्यालयी राहणार असून ११२ नंबरवर कॉल येताच वेळीच घटनास्थळ गाठून मदत करणार आहेत. त्यामुळे ही हेल्पलाईन वरदान ठरणार आहे.

बॉक्स

कॉल येताच कळणार लोकेशन

आपत्तीमध्ये मदत मागणाऱ्याने ११२ वर कॉल केल्यावर तो कॉल राज्यातील कॉल सेंटरला जाईल. त्यानंतर तेथून संबंधित जिल्ह्यातील म्हणजे महसूल, पोलीस फायद ब्रिगेड आदींशी संबंधित असल्यास पोलीस विभागाकडून त्या परिसरातील बिट मार्शलकडे जाईल. नंतर कर्मचारी घटनास्थळी पोहोचल्यावर जीपीएसवर नोंद होईल आणि तक्रारीचे निवारण करण्यात येईल.

बॉक्स

पोलिसांची मदत हवी असल्यास ११२ डायल करा

जिल्ह्यातील कुठल्याही गावातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ पोलिसांची मदत हवी असल्यास त्यांनी ११२ नंबर डायल करायचा आहे. त्यापुढच्या अवघ्या १० मिनिटांमध्ये पोलीस मदतीला धावून येतील, असे नियोजन करण्यात येत आहे. नवा हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित करण्याची प्रक्रिया जवळपास लवकरच पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. लवकरच ही सुविधा जिल्हाभरात पुरविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळाली.

बॉक्स

१५ चारचाकी वाहने दाखल

आपत्तीमध्ये सापडलेल्यांपर्यंत तातडीने पोहोचता यावे, यासाठी जिल्हा नियोजनाच्या विकास निधीतून १५ अद्यावत वाहने जिल्हा नियोजनाच्या विकास निधीतून १५ अद्यावत वाहने खरेदी करण्यात आली आहेत. मागील काही दिवसांपूर्वी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत ही वाहने पोलीस विभागाकडे सुपूर्द करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे निधीची तरतूद झाल्यानंतर पुन्हा आणखी काही वाहने तसेच दुचाकी खरेदी करण्यात येण्याची माहिती आहे.

बॉक्स

पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

‘सेंट्रलाईज कंट्रोल रूम’ला फोन आल्यावर कसा प्रतिसाद द्यायचा, कंटोल रूमला फोन आल्यावर काय प्रक्रिया करायची, आपत्तीमध्ये कशी मदत करायची याबाबत प्रशिक्षण जिल्ह्यातील ...... पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे.

कोट

आपत्कालीन परिस्थितीमध्ये अडकलेल्यांना पोलिसांची मदत घेता यावी, यासाठी ११२ क्रमांकाची हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. याबाबतची प्रणाली पोलीस कंट्रोल रूमला जोडण्यात आली आहे. हेल्पलाईनवर तक्रार आल्यानंतर तत्काळ दखल घेतली जाणार आहे. या प्रणालीमुळे नागरिकांना तक्रारींना जलद प्रतिसाद देता येईल आणि लोकाभिमुख काम करण्यास पोलिसांना मदत होईल.

- अरविंद साळवे, जिल्हा पोलीस अधीक्षक, चंद्रपूर