शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

पीकेव्हीचे विभाजन करून दोन वर्षांत सिंदेवाहीत कृषी विद्यापीठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:20 IST

चंद्रपूर : अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा (पीकेव्ही) विस्तार फार मोठा आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन वर्षांत ...

चंद्रपूर : अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा (पीकेव्ही) विस्तार फार मोठा आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन वर्षांत या विद्यापीठाचे विभाजन करून सिंदेवाही येथे नवीन कृषी विद्यापीठ व वनविद्या महाविद्यालयात निर्माण करण्यास आपले प्राधान्य आहे. हा संपूर्ण परिसर वनांनी व्यापला असल्यामुळे येथे लवकरच वनविद्या महाविद्यालय सुरू करण्यात येईल. या दोन्ही बाबतींत राज्य शासन सकारात्मक असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

स्व. वसंतराव नाईक जयंतीनिमित्त सिंदेवाही येथील कृषी विज्ञान केंद्रात शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती नागराज गेडाम, जिल्हा परिषदेचे सदस्य रमाकांत लोधे, पंचायत समितीच्या सभापती मंदा बाळबुधे, उपसभापती शीला कन्नाके, मधुकर मडावी, कृषी विज्ञान केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. कोल्हे, कार्यक्रम समन्वयक डॉ. व्ही. जी. नागदेवते, शास्त्रज्ञ डॉ. स्नेहा वेलादी, डॉ. विजय सिडाम, प्रकाश देवतळे, आदी उपस्थित होते.

पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, वसंतराव नाईक यांच्या काळात कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाची पायाभरणी झाली. त्यानंतर वसंतदादा पाटील व सुधाकरराव नाईक यांनी जलसंधारण, पाणी अडवा, पाणी जिरवा यांसारखे अभिनव उपक्रम राबविले. त्यामुळेच प्रगत शेतीमध्ये महाराष्ट्राचा देशात अव्वल क्रमांक आहे. विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यांचा काही भाग अशा पाच जिल्ह्यांतून ६५ लाख टन धानाचे उत्पन्न होते. शेतकरी सुखी होण्याची ही वाटचाल असल्याचेही त्यांनी नमूद केले. डॉ. पंजाबराव देशमुख आणि वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला मालार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी कृषिभूषण पुरस्कारप्राप्त शेतकरी दिनेश शेंडे आणि गुरुदास मसराम पालकमंत्र्यांनी सत्कार केला. कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी महाले, पंचायत समिती कृषी अधिकारी कांबळे, कृषी विज्ञान केंद्राचे कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.

बॉक्स

वनविद्या महाविद्यालयासाठी १८२ कोटींचा प्रस्ताव

सिंदेवाही येथील कृषी विज्ञान केंद्राच्या जागेवर वनविद्या महाविद्यालय स्थापन झाल्यास वनउपजांपासून शेतीला पूरक औषधी निर्माण होईल. या विषयावर वनविद्या महाविद्यालयात सखोल संशोधन केले जाईल. देशभरातील कृषी शास्त्रज्ञ येथे येण्यासाठी तयार आहेत. सिंदेवाही वनविद्या महाविद्यालय उभारण्यासाठी १८२ कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला, अशी माहितीही पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.