प्रारंभिक शिल्लक १५ कोटी ३१ लाख ३५ हजार दर्शविण्यात आली. सन २०२०-२१ या वित्तीय वर्षाच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकामध्ये २६ कोटी १० लाख ६५ हजार रुपये खर्च प्रस्तावित करण्यात आला. १० लाख २ हजार रुपयांचे हे शिलकी अंदाजपत्रक आहे. नगरपंचायतीच्या उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीने मालमत्ता कर, पाणी कर, स्वच्छता व आरोग्य कर वाढवण्याची शक्यता आहे.
ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण करून खत निर्मितीसाठी एक कोटी ५० लाखांची तरतूद, दिव्यांगासाठी एक लाख ६० हजार रुपये, महिला व बालकल्याण विकासाकरिता एक लाख ६० हजार, दुर्बल घटकांच्या विकास यासाठी एक लाख ६० हजार रुपयांची तरतूद केलेली आहे.
विशेष म्हणजे, शहरातील नागरिकांसाठी उद्यानाची निर्मिती करण्यासाठी दोन कोटी व तीन कोटींची तरतूद प्रशासकीय इमारतीसाठी करण्यात आली आहे. शहरांमध्ये अस्तित्वात असलेल्या विद्युत खांबावर एलईडी पथदिवे तथा शासनाकडून पुरविण्यात आलेले दिवे लावून विद्युत खर्च कमी करणे, शासनाकडून विशेष निधी उपलब्ध करून रस्ते नाल्यांचे काम करणे, यासाठीही नगरपंचायतीने तरतूद केलेली आहे.