शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

वीज कंपनीच्या उपकार्यकारी अभियंत्याला घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 23:19 IST

पावसाळा सुरू झाला असला तरी पाहिजे त्या प्रमाणात पाऊस झाला नाही. मागील दहा दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे चिमूर तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : पावसाळा सुरू झाला असला तरी पाहिजे त्या प्रमाणात पाऊस झाला नाही. मागील दहा दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे चिमूर तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात आणखी भर म्हणजे वीज वितरण कंपनीचे भारनियमन. शेतकऱ्याने पेरलेले सोयाबीन, कापूस व धानाचे पऱ्हे कसे जगवायचे, या चिंतेत आहे. भारनियमनामुळे त्रस्त शेतकऱ्यांनी सोमवारला चक्क वीज वितरण कंपनीचे कार्यालय गाठून उपकार्यकारी अभियंता यांना घेराव घातला व नंतर भारनियमन बंद करण्याबाबत निवेदन देण्यात आले.चिमूर तालुक्यातील विद्युत विभागांतर्गत येत असलेल्या सर्व सबस्टेशनमधून लोडशेडिंग सुरू आहे. या भागात कमी पावसामुळे दुष्काळसदृश्य परस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांची धान, कापूस, सोयाबीन व इतर पिके संकटात आली आहेत. सिंचनाची सोय असलेले शेतकरीही आपले पीक वाचवू शकत नाही. कारण वीज कंपनी मार्फत सुरू असलेल्या लोडशेडिंगमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. तालुक्यातील जवराबोडी येथील शेतकऱ्यांनी वारंवार तक्रारी करूनसुद्धा कार्यालयांकडून त्यांना न्याय मिळाला नाही. व सौर पंपाची सक्ती न करता कृषिपंपासाठी अर्ज करण्याऱ्यां शेतकऱ्यांना विद्युत पुरवठा करण्यासाठी डिमांड द्यावे, यासह सुरू असलेले भारनियमन बंद करावे. यासह आदी मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी भैयासाहेब बेहरे व तहसीलदार संजय नागतीलक यांना देण्यात आले. यावेळी जि.प. सदस्य सतीश वारजुकर, माधव बिरजे, राम राऊत, संजय डोंगरे, विजय गावंडे, राजू चौधरी आदी उपस्थित होते.