शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

श्रीरामाचा गजर...

By admin | Updated: April 16, 2016 00:35 IST

रामजन्मोत्सवाच्या विलोभनीय सोहळ्याने शुक्रवारी चंद्रपूरकरांच्या डोळ्यांचे अक्षरश: पारणे फेडले.

शोभायात्रा : रामनामाच्या जयघोषाने शहर दुमदुमलेचंद्रपूर: रामजन्मोत्सवाच्या विलोभनीय सोहळ्याने शुक्रवारी चंद्रपूरकरांच्या डोळ्यांचे अक्षरश: पारणे फेडले. रामनामाचा जयघोष करीत सायंकाळी गांधी चौकातून निघालेल्या रॅलीतील विविध देखावे पाहण्यासाठी चंद्रपुरांनी दुतर्फा तुडूंब गर्दी केली होती. विविध हिंदुत्ववादी संघटनांच्यावतीने शहरात रामजन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त शहरातील विविध चौक भगव्या तोरण, पताकांनी सजले होते. मुख्य मार्गावरील चौका-चौकात डी.जे. लावण्यात आले होते. त्यावर रामनामाचा जप सुरू होता. सायंकाळी ४ वाजतानंतर शहरातील वातावरण अधिक भक्तीमय झाले. रामभक्तांचे लोंढेच्या लोंढे गांधी चौकाकडे शोभायात्रा पाहण्यासाठी जात होते. सायंकाळी ७ वाजता शोभायात्रेला गांधी चौकातून प्रारंभ झाला. यात विविध हिंदुत्ववादी संघटना सहभागी झाल्या होत्या. शोभायात्रेत विविध देखावे भाविकांचे लक्ष वेधून घेत होते. बँडपथक आणि डीजेच्या तालावर अवघ्या तरूणाईने ठेका धरला होता.‘रामजी की निकली सवांरी’ सारखी गाणी डीजेवर वाजविली जात होती. जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार नाना श्यामकुळे, महापौर राखी कंचर्लावार या प्रमुख लोकप्रतिनिधींसह भाजपा, शिवसेना, बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते शोभायात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होेते. (प्रतिनिधी)शोभायात्रा मार्गावर खाद्यपेयाचे स्टॉलस्थानिक गांधी चौकातून शोभायात्रेला प्रारंभ झाला. गांधी चौक ते जटपुरा गेट मार्गावर शिवसेना, मयात्मज सुतार समाज, आझाद बगिचा मित्र परिवार, मनसे, माहेश्वर संघटना, हिवरपुरी गणेश मंडळ, एलेवन स्टार, गवळी समाज मंडळ यासह विविध सामाजिक संघटनांच्यावतीने ठिकठिकाणी खाद्य पदार्थांचे स्टॉल लावले होते. रॅलीत अवतरले स्वच्छतादूतशोभायात्रेच्या मार्गात विविध ठिकाणी खाद्यान्न आणि शीतपेयांचे स्टॉल लागले होते. पाऊच आणि कागदी प्लेटामधून पदार्थ खाल्यावर ते रस्त्यावर फेकले जात होते. मात्र वैष्णव शिंपी समाज, पतंजली योगपिठाच्या कार्यकर्त्यांनी स्वयंस्फूर्तीने हा कचरा उचलला.शोभायात्रेदरम्यान श्री काळाराम मंदिरातून श्रीरामांच्या मूर्तीची पालखी काढण्यात आली. ही पालखी जटपुरा गेट परिसरात आल्यावर राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी खांद्यावर घेतली आणि श्रीरामांचा जयजयकार केला.अन् युवकांनी ट्रॅक्टर ओढलेशोभायात्रेत वाहनांवरून विविध देखावे सादर करण्यात आले. त्यातील एक देखावा असलेले ट्रॅक्टर गांधी चौकाच्या पुढे गेल्यानंतर तांत्रिक बिघाडामुळे अचानक बंद पडले. एकेरी मार्ग व त्यातच नागरिकांची दुतर्फा गर्दी लक्षात घेता सदर ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजुला अथवा तेथून दुसऱ्या ठिकाणी हलविणे अशक्य होते. ही बाब लक्षात घेऊन शोभायात्रेतील काही कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन सदर ट्रॅक्टर अक्षरश: हाताने ओढत पुढे नेले. विशेष म्हणजे शोभायात्रा संपेस्तोवर हे ट्रक्टर बंद अवस्थेत सहभागी होते.