शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

शिवारभेटीतून गावे होणार टंचाईमुक्त

By admin | Updated: January 10, 2015 01:02 IST

वरुणराजाच्या अवकृपेमुळे यावर्षी कोरड्या दुष्काळाचे अस्मानी संकट ओढावले. मान्सून कालावधीत कमी पर्जन्यमान झाल्याने जिल्ह्याची भूजल पातळी ०.०६ मीटरने खालावली.

मंगेश भांडेकर  चंद्रपूरवरुणराजाच्या अवकृपेमुळे यावर्षी कोरड्या दुष्काळाचे अस्मानी संकट ओढावले. मान्सून कालावधीत कमी पर्जन्यमान झाल्याने जिल्ह्याची भूजल पातळी ०.०६ मीटरने खालावली. त्यामुळे पाणलोट क्षेत्रातील तब्बल ७६ गावांत पाणीटंचाई निर्माण होणार आहे. या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनाने राज्यभरात जलयुक्त शिवार अभियान १ जानेवारीपासून सुरु केले आहे. या अभियानाच्या माध्यमातून गावांना पाणी टंचाईमुक्त करण्यात येणार आहे. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेमार्फत दरवर्षी निरीक्षण विहिरींची पाणी पातळी मोजली जाते. उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हास्तरावर संभाव्य पाणीटंचाई आराखडे तयार करण्याकरिता तसेच संभाव्य टंचाई परिस्थितीचे आकलन करण्याकरिता तालुकानिहाय व पाणलोट क्षेत्रनिहाय निरीक्षण विहिरीतील मान्सुनोत्तर भूजल स्थिर पातळीचा आढावा घेण्यात येतो. या आकलनात राज्यातील तब्बल १९० तालुक्यांची भूजल पातळी तीन मीटरने घटल्याचे समोर आले आहे. तर १८४ तालुक्यात २० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीपातळी घटली आहे. तसेच १८८ तालुुक्यात भूगर्भातील पाणीपातळीत दोन मीटरपेक्षा जास्त घट झाल्याचे निष्पन्न झाले. भूजल सर्वेक्षण विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करून पाणलोट क्षेत्रातील गावांमध्ये उन्हळ्यात पाणीटंचाई निर्माण होणार असल्याचे संकेत दिले. याची दखल घेत राज्य शासनाने दरवर्षी निर्माण होणारी पाणी टंचाई यावर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार भेट अभियान आखले आहे. भूजल पातळीत झालेली घट व उन्हाळ्यात निर्माण होणारी पाणी टंचाई यावर मात करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. २०१९ पर्यंत राज्यातील सर्व जिल्ह्यातील गावे पाणी टंचाईमुक्त करण्याचा शासनाचा संकल्प आहे.