शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

शेखर धोटे यांचा राजीनामा एकमताने मंजूर

By admin | Updated: July 22, 2015 01:32 IST

येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष शेखर धोटे यांचा राजीनामा अखेर मंगळवारी झालेल्या विशेष सभेत एकमताने मंजूर करण्यात आला.

प्रतीक्षा नव्या अध्यक्षाची : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत घडामोडींना वेगचंद्रपूर : येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष शेखर धोटे यांचा राजीनामा अखेर मंगळवारी झालेल्या विशेष सभेत एकमताने मंजूर करण्यात आला. २७ संचालकांपैकी एकमेव संदीप गड्डमवार या बैठकीला अनुपस्थित होते. उपस्थित सर्व संचालकांनी धोटे यांच्या राजीनाम्याला स्विकृती दिली.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात दुपारी १२.३० वाजता ही बैठक सुरू झाली. विषयपत्रिकेवर केवळ राजीनामा स्वीकृतीचा एकमेव विषय होता. केवळ अर्धा तास चाललेल्या या बैठकीत अध्यक्ष शेखर धोटे यांच्यासह उपाध्यक्ष प्रभा वासाडे यांच्याही राजिनाम्याला एकमताने मंजुरी मिळाली.गेल्या १६ जुलैला या विषयावरील चर्चेसाठी संचालकांची विशेष बैठक बोलाविण्यात आली होती. मात्र कोरमअभावी ती तहकूब करून २१ जुलैला घेण्यात आली. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चित्तरंजन नाईक यांच्याकडे प्रशासकीय अधिकार आले असून पुढील निवडणुकीपर्यंत त्यांच्याकडेच कामकाज राहणार आहे. बैठकीत मंजूर करण्यात आलेले दोन्ही राजीनामे सहकार खाते प्रधिकरणाकडे पाठविण्यात येणार असून त्यानंतर अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी निवडणुकीची पुढील तारीख ठरविली जाणार आहे. यासाठी किमान १० ते १५ दिवसांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. (जिल्हा प्रतिनिधी)सर्वांचे चांगले सहकार्य आपल्या कार्यकाळात लाभले. त्यामुळचे बँक विकासाच्या प्रगतिपथावर आपण नेऊ शकलो. आपल्या कार्यकाळात बँकेची चांगली प्रगती झाली. यापुढे आपण अध्यक्ष नसलो तरी बँकेच्या प्रगतीमध्ये आपला नेहमी हातभार राहील.- शेखर धोटे, माजी अध्यक्ष १८ संचालक भ्रमंतीवरइकडे शेखर धोटे यांचा राजीनामा मंजूर होताच दुसरीकडे बँकेतील १८ संचालकांना भ्रमंतीवर पाठविण्याच्या हालचालीही सुरू झाल्या आहेत. २७ संचालकांच्या या बँकेत पाऊणकर यांच्या नावाला काही संचालकांनी अद्यापही पसंती दर्शविलेली नाही. यामुळे वेळेवर काही दगाफाटा होऊ नये, याची खबरदारी म्हणून हा भ्रमंतीचा बेत आखण्यात आल्याची माहिती एका संचालकाने दिली आहे.