शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

ती झाली अवघ्या २१व्या वर्षी गावची सरपंच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:24 IST

अपक्ष म्हणून लढविली निवडणूक : अविरोध झाली सरपंच चंद्रपूर : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका नुकत्याच पार पडल्या. आता सरपंचपदाची निवड ...

अपक्ष म्हणून लढविली निवडणूक : अविरोध झाली सरपंच

चंद्रपूर : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका नुकत्याच पार पडल्या. आता सरपंचपदाची निवड प्रक्रिया सुरू झाली आहेत. ठिकठिकणी अनेक जण सरपंच होण्यासाठी दावे-प्रतिदावे करीत आहेत. अशातच वरोरा तालुक्यातील महाडोळी गटग्रामपंचायतमध्ये सर्वसाधारण आणि शेतकरी कुटुंबातील तरुणीची वयाच्या अवघ्या २१व्या वर्षी सरपंचपदी बिनविरोध वर्णी लागली, त्यामुळे गावातच नाही, तर परिसरात सर्वच तिचे कौतुक केले जात आहे. प्रतिभा शालीकराव मांडवकर(२१) असे सरपंच तरुणीचे नाव आहे. सर्वात कमी वयाच्या सदस्य म्हणून प्रतिभा मांडवकर ठरल्याचे बोलल्या जात आहे. त्या ओबीसी महिला प्रवर्गातून निवडून आल्या आणि आता त्यांच्या गळ्यात सरपंचपदाची माळ पडली आहे. गावाच्या विकासाठी काम करणार असून, शिक्षणही पूर्ण करणार असल्याचे मत ‘लोकमत’सोबत बोलताना व्यक्त केले.

--

बाॅक्स

प्रतिभा मांडवकर या मूळच्या शेगाव या गावच्या असून, त्यांचे आनंदनिकेतन महाविद्यालय, आनंदवन येथे बीएससी द्वितीय वर्षाला शिक्षण सुरू आहे, तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बीए सुरू आहे.

कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही प्रतिभा मांडवकर या जिद्दीच्या भरवशावर अपक्ष उमेदवार म्हणून ग्रामपंचायत निवडणुकीत अर्ज केला होता. अपक्ष उमेदवार असतानाही त्यांनी पक्षांना, पॅनलला पराजीत करून विजयाची माळ आपल्या गळ्यात टाकली. एका सर्वसामान्य शेतकऱ्यांची मुलगी असलेल्या प्रतिभा यांची सरपंचपदी निवड झाली.

कोट

माझ्या मनात नेहमीच समाजासाठी काहीतरी चांगले करण्याची इच्छा होती. त्यामुळे मी या वर्षी निवडणुकीत अपक्ष म्हणून अर्ज भरला. निवडणुकीत सर्व मतदार बांधवांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला निवडून दिले. आज माझी महाडोळी गट ग्रामपंचायतमध्ये सरपंचपदी निवड झाली. मी गावच्या विकासासाठी कटिबद्द असून, सर्वोतोपरी गावाचा विकास करणे हाच माझा हेतू आहे.

- प्रतिभा शालीकराव मांडवकर

सरपंच महाडोळी ग्रामपंचायत

सात सदस्य