शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरण केंद्रात गर्दी टाळण्यासाठी आता स्वतंत्र नोंदणी कक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:53 IST

शहरात १ मार्च २०२१ पासून ६० वर्षांवरील सर्वसामान्य नागरिक आणि ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त नागरिकांच्या लसीकरणाची नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन सुरू ...

शहरात १ मार्च २०२१ पासून ६० वर्षांवरील सर्वसामान्य नागरिक आणि ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त नागरिकांच्या लसीकरणाची नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन सुरू झाली. लसीकरणासाठी को-विन अ‍ॅप, आरोग्य सेतू अ‍ॅप व संकेतस्थळाचा पर्याय देण्यात आला. लस घेण्याकरिता सोयीप्रमाणे दिवस व वेळेची निवड करण्याची मुभा असल्याने चंद्रपूर शहरातील नागरिक लसीकरण केंद्रात गर्दी करीत आहेत. यातून कोरोना संसर्गाची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मनपा आरोग्य विभागाने लसीकरण केंद्रापासून नोंदणी कक्ष वेगळ्या ठिकाणी ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याकरिता संगणक संच, तांत्रिक सुविधा व प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणार आहे.

कोण करू शकतो नोंदणी?

एका मोबाईल क्रमांकावरून चार नावे नोंदविता येणार असल्याने ज्यांच्याकडे मोबाईल नाही, त्यांनाच या नोंदणी कक्षाचा लाभ घेता येईल. शिवाय, ज्या व्यक्तींना ऑनलाईन स्लॉट बुक करता येत नाहीत अशांनी आधारकार्ड, छायाचित्र आयडी, पॅनकार्ड व ओळखपत्र सादर केल्यास नोंदणी केली जाणार आहे.

चंद्रपुरातील कोरोना लसीकरण केंद्र

दुर्गापूर येथील आरोग्य केंद्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा जिल्हा रूग्णालय, महानगर पालिकातंर्गत रामचंद्र हिंदी प्राथमिक शाळा, टागोर प्राथमिक शाळा, मातोश्री शाळा तुकूम, पोलीस रूग्णालय (केवळ पोलीस) आदी शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरण सुरू आहे. सोमवारपासून शहरातील पाच खासगी हॉस्पीटलमध्ये लसीकरण सुरू होण्याची शक्यता आहे.

कोट

कोरोना लस घेताना पुणे व मुंबईसारखी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी चंद्रपुरात लसीकरण केंद्र व नोंदणी कक्ष वेगवेगळे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रत्येक व्यक्ती विविध कारणे सांगून एकाचवेळी गर्दी करतात. कोरोना बाधितांची संख्या बघता असा प्रकार टाळणे गरजेचे आहे.

-आविष्कार खंडारे, वैद्यकीय अधिकारी मनपा, चंद्रपूर