शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरण केंद्रात गर्दी टाळण्यासाठी स्वतंत्र नोंदणी कक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 10:30 IST

शहरात १ मार्च २०२१ पासून ६० वर्षांवरील सर्वसामान्य नागरिक आणि ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त नागरिकांच्या लसीकरणाची नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन सुरू झाली. लसीकरणासाठी को-विन अ‍ॅप, आरोग्य सेतू अ‍ॅप व संकेतस्थळाचा पर्याय देण्यात आला. लस घेण्याकरिता सोयीप्रमाणे दिवस व वेळेची निवड करण्याची मुभा असल्याने चंद्रपूर शहरातील नागरिक लसीकरण केंद्रात गर्दी करीत आहेत. यातून कोरोना संसर्गाची शक्यता नाकारता येत नाही.

ठळक मुद्देमनपाचा प्रयोग : कोरोना लस घेणाऱ्या ज्येष्ठांची अडचण दूर होणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर :  को-विन अ‍ॅपवर नोंदणी करण्यास अडचणी आल्यास  थेट कोरोना लसीकरण केंद्रातच नोंदणीनंतर लसीकरणाची मुभा होती. मात्र, लस घेण्यासाठी नागरिक गर्दी करीत असल्याने त्यावर उपाय म्हणून आता स्वतंत्र नोंदणी कक्ष तयार करण्याचा निर्णय महानगर पालिकेने बुधवारी घेतला आहे. शहरात १ मार्च २०२१ पासून ६० वर्षांवरील सर्वसामान्य नागरिक आणि ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त नागरिकांच्या लसीकरणाची नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन सुरू झाली. लसीकरणासाठी को-विन अ‍ॅप, आरोग्य सेतू अ‍ॅप व संकेतस्थळाचा पर्याय देण्यात आला. लस घेण्याकरिता सोयीप्रमाणे दिवस व वेळेची निवड करण्याची मुभा असल्याने चंद्रपूर शहरातील नागरिक लसीकरण केंद्रात गर्दी करीत आहेत. यातून कोरोना संसर्गाची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मनपा आरोग्य विभागाने लसीकरण केंद्रापासून नोंदणी कक्ष वेगळ्या ठिकाणी ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याकरिता संगणक संच, प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणार आहे. 

कोण करू शकतो नोंदणी?एका मोबाईल क्रमांकावरून चार नावे नोंदविता येणार असल्याने ज्यांच्याकडे मोबाईल नाही, त्यांनाच या नोंदणी कक्षाचा लाभ घेता येईल. शिवाय, ज्या व्यक्तींना ऑनलाईन स्लॉट बुक करता येत नाहीत अशांनी आधारकार्ड, छायाचित्र आयडी, पॅनकार्ड व ओळखपत्र सादर केल्यास नोंदणी केली जाणार आहे.

कोरोना लस घेताना पुणे व मुंबईसारखी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी चंद्रपुरात लसीकरण केंद्र व नोंदणी कक्ष वेगवेगळे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रत्येक व्यक्ती विविध कारणे सांगून एकाचवेळी गर्दी करतात. कोरोना बाधितांची संख्या बघता असा प्रकार टाळणे गरजेचे आहे.  -आविष्कार खंडारे, वैद्यकीय अधिकारी मनपा, चंद्रपूर 

चंद्रपुरातील कोरोना लसीकरण केंद्रदुर्गापूर येथील आरोग्य केंद्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा जिल्हा रूग्णालय, महानगर पालिकातंर्गत रामचंद्र हिंदी प्राथमिक शाळा, टागोर प्राथमिक शाळा, मातोश्री शाळा तुकूम, पोलीस रूग्णालय (केवळ पोलीस) आदी शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरण सुरू आहे. सोमवारपासून शहरातील पाच खासगी हॉस्पीटलमध्ये लसीकरण सुरू होण्याची शक्यता आहे. 

लसीकरणासाठी पुन्हा एक केंद्र वाढविणार चंद्रपूर शहरातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी अडचणी येऊ नये, यादृष्टीने एक लसीकरण केंद्र वाढविण्यात येणार आहे. दोन-तीन दिवसात केंद्र सुरू झाल्यास लसीकरण केंद्रांची संख्या चार होणार आहे. अर्बन टॉस्क फोर्स बैठकीत महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समितीचे सभापती रवी आसवानी उपस्थित होते.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस