धान उत्पादक चिंतेत : अधिवेशन संपण्यावर मात्र शेतकऱ्यांचे समाधान नाही, हेच का ‘अच्छे दिन’चंद्रपूर : भाजप सरकार सत्तेत येण्यापूर्वी शेतकरी व सामान्य नागरिकांना विविध आमिष दाखविण्यात आले. मात्र, कष्ट करून पिकवलेल्या शेतमालाची कवडीमोल दराने खरेदी होत असल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे. भाजप सरकारचे हेच का ‘अच्छे दिन’ असा प्रश्न शेतकऱ्यांनी केला आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतातून आता धानाच्या राशी घरी येत आहे. मात्र, मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी ३०० ते ४०० रुपये प्रति क्विंटल भाव कमी मिळत असल्यामुळे धान उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. अ दर्जाचे धान १९०० ते २१०० रुपये क्विंटल दराने विक्री होत आहे. गत वर्षीही हिच परिस्थीती होते. २०१३ मध्ये तीन हजार रुपयांपर्यत धानाचे दर वाढले होते. मात्र, यावर्षी अपुऱ्या पावसामुळे दुष्काळ परिस्थिती, धान पिकांवर विविध रोगाची साथ व सततची नापिकी यामुळे धान उत्पादक शेतकरी वैतागलेला असताना, धानाला योग्य भाव नसल्यामुळे शेतकरी पूर्णत: खचला आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, असे संबोधल्या जाते. शेतकरी सुखी तर जग सुखी असेही म्हटल्या जाते. मात्र, आजच्या स्थितीत धान उत्पादक शेतकऱ्यांचे वास्तव बघितले तर जगाचा पोशिंदा खरोखरच सुखी आहे काय, याचा विचार न केलेला बरा. शेतकऱ्यासारखा कर्जबाजरी या देशात कुणीच नाही. शेतकरी कर्जाच्या दलदलित जन्म घेतो व कर्जाच्या दलदलित मरतो, हे खर वास्तव आहे. कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ, कधी दुबार पेरणी तर कधी तिबार पेरणी, दिवसेंदिवस बी-बियाणांचे व रासायनिक खताचे तसेच किटकनाशकांचे भाव गगणाला भिडणारे, दिवसेंदिवस उत्पादनात घट तर कधी नापिकी, कधी अस्मानी संकट तर कधी सुलतानी संकट, कधी उभ्या पिकात वन्यप्राण्यांचा हैदोस तर कधी विविध रोगाची साथ या सर्व कालचक्रावर मात करुन धान उत्पादक शेतकरी आपला भविष्यकाळ सुखी करण्यासाठी शेतात राबतो. पण त्याच्या नशिबी कुठले सुख आले. उलट दु:खाचे व कष्टाचे तसेच कर्जाचे डोंगर उभे आहे, शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा असेल तर शासनाने वेळीच शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर करावी, अन्यथा आत्महत्या थांबणे कठीण होईल, असे चित्र आहे. (स्थानिक प्रतिनिधी)रबी पिकांवरही दुष्काळाची छाया४खरिप पीक हातातून गेले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना रब्बी हंगांमावर आशा होती. सध्यास्थितीत रब्बी पिके चांगली आहेत. मात्र गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण असल्याने रब्बी पिके धोक्यात आली आहेत. ढगाळ वातावरणामुळे पिकांवर अळीचा प्रादुर्भाव वाढला असून हरभरा, तूर आदी पिकांवर फवारणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. ढगाळ वातावरण असेच राहिल्यास मोठ्या संकटाला समोरे जावे लागणार आहे. खासगी व्यापाऱ्यांकडून गावागावात धान खरेदी४धानाला भाव मिळत नसल्याने बाजार समित्यांत धानाची आवक घटली आहे. याचा फायदा घेत खासगी व्यापारी गावागावात जाऊन शेतकऱ्यांच्या दारावर धान खरेदी करीत आहेत. ज्या शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे, असे शेतकरी भावाचा विचार न करता धानाची विक्री करीत आहेत.कर्जाचा डोंगर घेऊन जगत आहे शेतकरी४‘अच्छे दिन’ कधी येणार म्हणून धान उत्पादक शेतकरी प्रतीक्षा करीत आहे. मागील वर्षीपेक्षा यावर्षी धानाला ३०० ते ४०० रुपये भाव कमी आहे. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना आपला माल कवडीमोल भावाने विकावे लागत आहे. आधीच दुष्काळ परिस्थिती व नापिकी यामुळे वैतागलेला धान उत्पादक शेतकरी पूर्णत: खचलेला आहे. कर्जाचा डोंगर आणि लागवड खर्च भरुन निघत नसल्याने आत्महत्या वाढत आहे. याकडे शासनाने लक्ष द्यावे.शेतकऱ्यांचे होत आहे शोषण४निसर्गावर मात करुन शेतकऱ्यांच्या हातात जे काही उत्पादन पडतो त्या उत्पादनाला योग्य भाव मिळत नाही. व्यापारी वर्गाकडूनही मोठ्या प्रमाणात लुट सुरु आहे. विपणन व्यवस्था व पैशाची गरज असल्यामुळे कवडीमोल दराने शेतकऱ्यांना धान विकावे लागत आहे. भाव मिळेपर्यंत गरीब शेतकऱ्यांकडे धान्य साठवून ठेवण्याची व्यवस्था नसते. उत्पादन हाती येताच वर्षभराचे बजेट ठरवावे लागते. उसनवारीने घेतलेले कर्ज वेळेच्या आत फेडावे लागते. त्यामुळे शेतकऱ्याचे शोषण होत आहे. लोकप्रतिनिधी सोयीच्या राजकारणात व्यस्त४धान उत्पादक शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध पावले उचलण्यास शासन व लोकप्रतिनिधी गंभीर नाही. शेतकरी हा गरीबच राहावा व त्यांने कर्जाच्या ओझ्याखाली आत्महत्या करावी आणि त्यांच्या आत्महत्येवर लोकप्रतिनिधी राजकारण करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. निवडणुका जवळ आल्या की, राजकारण्यांना शेतकरी व शेतमजूर दिसतात. निवडणुका आटोपल्या की, अधिकाऱ्यांच्या बदल्या, ठेकेदार व शाळांची खैरात वाटणे तसेच सोयीचे राजकारण यातच वेळ जाते.
धानाची कवडीमोल भावात विक्री
By admin | Updated: December 22, 2015 01:03 IST