शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

महिला कर्मचाऱ्यांची सुरक्षा धोक्यात !

By admin | Updated: February 21, 2016 00:35 IST

वनविकास महामंडळात विविध पदावर कार्यरत महिला कर्मचाऱ्यांना वेळीअवेळी , रात्री-बेरात्री बोलावणे ...

वनविकास महामंडळील प्रकार : वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे महिलांची तक्रारकोठारी : वनविकास महामंडळात विविध पदावर कार्यरत महिला कर्मचाऱ्यांना वेळीअवेळी , रात्री-बेरात्री बोलावणे किंवा त्यांच्या निवासात प्रवेश करून त्यांच्यावर बळजबरी करण्याच्या प्रकाराने येथे कार्यरत वनरक्षकासह अन्य महिला कर्मचाऱ्यांची सुरक्षा धोक्यात आली आहे. अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार वर्तणुकीने महिला कर्मचारी प्रचंड दबावात व दहशतीत वावरत आहेत. याबाबत महिलांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारही करून आपबिती कथन केली आहे.वनविकास महामंडळात वनरक्षक पदावर अनेक महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यात अनेक युवतींची भरती आहे. त्यांना क्षेत्रीय कामावर वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे जावे लागते. दिवसभर जंगलातील कामे करावी लागतात. जंगल, जंगली प्राणी व क्षेत्रीय कामाची जबाबदारी एका चौकीदाराच्या सहकार्याने पार पाडावी लागते. अशातच वन अधिकारी आपल्या अधिकारांचा वापर करीत महिला वनरक्षकास एकटीला वाहनात बसवून जंगलात घेऊन जातात तर कधी स्वत:चा बडेजाव करण्यासाठी या कर्मचाऱ्यांचा वापर करतात. कधी कधी दारुच्या नशेत धुंद झालेले अधिकारी मध्यरात्री महिला कर्मचाऱ्यांच्या निवासात प्रवेश करतात. त्यांच्याशी असभ्य वर्तन करुन लैगिंक छळ करण्याचा प्रयत्न करतात. सदर प्रकाराची तोंडी तक्रार संबंधित अधिकाऱ्यांना दिल्यास कर्मचाऱ्यास तोंड बंद ठेवण्याची ताकीद दिली जाते. अधिकारी स्वत:च्या अधिकाराचा गैरवापर महिला कर्मचाऱ्यांसोबत करीत त्यांचे लैगिक शोषण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र त्याविरोधात गेल्यास नोकरीला मुकावे लागते. काही विवाहित असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना छेडछाड करण्यात विवाहित पुरुष कर्मचारीही मागे नाहीत.या प्रकाराची तक्रार प्रादेशिक व्यवस्थापकाकडे करण्यात आली असून त्या महिला कर्मचाऱ्यांनी आपबिती कथन केली व गैरवर्तणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आता वरिष्ठ अधिकारी या प्रकाराची दखल घेऊन काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)