शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षेविनाच सुरू आहे मुलींच्या वसतिगृहाचा कारभार

By admin | Updated: March 18, 2017 00:42 IST

गडचांदूर येथील आदिवासी मुलींच्या वसतिगृहातील गृहपाल मुख्यालयी राहत नसल्यामुळे विद्यार्थिनीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

गृहपाल प्रभारी: विविध समस्यांकडेही प्रशासनाचे दुर्लक्षकोरपना : गडचांदूर येथील आदिवासी मुलींच्या वसतिगृहातील गृहपाल मुख्यालयी राहत नसल्यामुळे विद्यार्थिनीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या असून प्रकल्प अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर अंतर्गत गडचांदूर येथे आदिवासी मुलींचे वसतीगृह चालविण्यात येते. यामध्ये आठवी ते बीए अंतिम वर्षापर्यंत शिक्षण घेणाऱ्या ५५ विद्यार्थिनी राहतात. वसतिगृह विद्यार्थिनीची देखभाल तसेच सुरक्षा करण्यासाठी गृहपाल आणि महिला शिपाईची नियुक्ती केली गेली. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून गृहपालाचे पद रिक्त आहे. याचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला. प्रभारी गृहपाल हे ९० किलोमीटरहून ये-जा करतात. ते वसतिगृहात येऊन मुलींच्या अडचणींबाबत विचारणा करीत नाहीत. कार्यालयात येणे आणि परस्पर निघून जाणे हा त्यांचा नित्याचा दिनक्रम ठरला आहे. यामुळे वसतिगृहात अनेक समस्यांनी घर केले आहे. मात्र, याकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नाही. ग्रामीण भागातील आदिवासी मुलींना शिक्षणाची समान संधी मिळावी, या उद्देशातून आदिवासी वसतिगृह चालविले जाते. मात्र, प्रशासन आणि अव्यवस्थापनाच्या कमालीच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थिनींची सुरक्षाच धोक्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)वेळेपूर्वीच निघून जातात कर्मचारीआदिवासी मुलीच्या वसतिगृहात रात्रीच्या वेळी गृहपाल तसेच शिपाई यांची उपस्थिती असणे गरजेचे आहे. मात्र, त्यापूर्वीच हे दोघेही निघून जातात. त्यामुळे नशिबाच्या भरवशावरच सुरक्षेचा खेळ सध्या सुरु आहे.विद्यावेतनही मिळाले नाहीआदिवासी प्रकल्प कार्यालयाकडून विद्यार्थिनीना प्रत्येकी ६०० रुपये एवढे विद्यावेतन दिले जाते. मात्र अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे या मुलीना जून २०१६ पासून विद्यावेतन मिळालेले नाही. त्यामुळे मुलीसमोर आर्थिक संकटही उभे आहे.