शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

राज्यसेवा पूर्व परीक्षा केंद्र परिसरात १४४ कलम लागू

By admin | Updated: April 5, 2015 01:32 IST

५ एप्रिल रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा केंद्राच्या परिसरात येथील जिल्हाधिकाऱ्यांनी सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत कलम १४४ लागू केली आहे.

चंद्रपूर : ५ एप्रिल रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा केंद्राच्या परिसरात येथील जिल्हाधिकाऱ्यांनी सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत कलम १४४ लागू केली आहे. त्या अनुषंगाने परीक्षा केंद्राच्या परिसरात दोन किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती समुहास एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे.सदर परीक्षा केंद्राच्या १०० मीटर क्षेत्रांतर्गत नियमित व रोजचे वाहतुकीव्यतिरिक्त इतर हालचालींना प्रतिबंध राहील. उपरोक्त कालावधित परीक्षा दिनी परीक्षा केंद्राच्या १०० मिटर क्षेत्राअंतर्गत झेरॉक्स, फॅक्स, ई-मेल, मोबाईल फोन आणि इंटरनेट सवलती किंवा अन्य कोणतेही कम्युनिकेशन सवलतीवर प्रतिबंध राहील. सदर आदेश सरदार पटेल महाविद्यालय गंज वार्ड चंद्रपूर, जनता हायस्कूल जवळ डॉ. वासलवार हॉस्पीटल चंद्रपूर, भवानजीभाई चव्हाण हायस्कूल मूल रोड चंद्रपूर, डॉ. आंबेडकर कॉलेज आॅफ आर्टस कॉमर्स अ‍ॅन्ड सायन्स नागपूर रोड चंद्रपूर, सेंट मायकल इंग्लिश स्कुल नगिनाबाग चंद्रपूर, विद्याविहार कॉन्व्हेंट हायस्कूल अ‍ॅन्ड ज्युनियर सायन्स कॉलेज तुकुम चंद्रपूर, मुरलीधर बागला कॉन्व्हेंट हायस्कुल बाबुपेठ चंद्रपूर, रफी अहमद किदवाई मेमोरियम हायस्कुल अन्ड ज्युनियर कॉलेज घुटकाळा वार्ड चंद्रपूर या ठिकाणी लागू राहील.या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती व इसम वा समुह प्रचलित कायदेशीर तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकातून कळविले आहे. (प्रतिनिधी)