शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक तडाखा तरुणाईला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:24 IST

जिल्ह्यात आतापर्यंत २८ हजार ११० कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामध्ये २७ हजार ४३२ जिल्ह्यातील, ५१३ जिल्ह्याबाहेर व ८५ ...

जिल्ह्यात आतापर्यंत २८ हजार ११० कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामध्ये २७ हजार ४३२ जिल्ह्यातील, ५१३ जिल्ह्याबाहेर व ८५ राज्याबाहेरील रुग्ण आहेत. उपचारानंतर २५ हजार ३९० जण कोरोनामुक्त झाले. अ‍ॅक्टीव रुग्णांची संख्या दोन हजार २९१ वर पोहोचली आहे. आरोग्य विभागाने चाचण्यांची संख्या वाढविल्याने दररोज नवीन अ‍ॅक्टिव रुग्णांची भर पडत आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गतवर्षी लागू केलेल्या कडक निर्बंधामुळे नागरिकांचे हाल झाले. हातावर पोट असणारे तर कोलमडून पडले. त्यातून बाहेर निघण्याचा प्रयत्न सुरू असतानाच संसर्गाची दुसरी लाट जिल्ह्यात धडकली. अशा अस्वस्थतेच्या कालावधीत भीतीपोटी घरातच दडून राहण्याचा मार्ग कुणीही स्वीकारणार नाही, हेही वास्तव आहे; मात्र रोजगारासाठी बाहेर निघालेल्या १९ ते ४० वयोगटातील तरुण वर्गालाच कोरोना गाठत असल्याचे वास्तव आरोग्य विभागाच्या अहलावातून पुढे आले आहे.

बालकांनाही कोरोनाचा विळखा

जिल्ह्यात ३१ मार्चपर्यंत ० ते ५ वयोगटातील ४२७ बालकांना कोरोनाने गाठले. कुटुंबातील व्यक्ती पॉझिटिव्ह झाल्यानंतर गृहविलगीकरणातील नियमांचे पालन न केल्याने बालकांना बाधा होत आहे, असे निरीक्षण एका शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यानेच ‘लोकमत’ कडे नोंदविले. त्यामुळे गृहविलगीकरण नियमांचे पालन करण्यासाठी गाइडलाइन असताना पथक व समित्या कागदावरच आहेत काय, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

तपासण्या पुन्हा वाढविल्या

होळी व रंगपंचमी उत्सवामुळे आरटीपीसीआर व अ‍ॅन्टिजन तपासण्यांची संख्या घटली होती; मात्र मंगळवारपासून पुन्हा चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. गुरुवारी दोनही मिळून दोन हजार ५८९ चाचण्या झाल्या. चाचण्यांचा वेग पुन्हा वाढणार असल्याने रुग्णसंख्याही वाढण्याची शक्यता आहे.

वयोगटानुसार रूग्ण संख्या (१ एप्रिलपर्यंत)

० ते ५- ४२७

६ ते १८-२३०८

१९ ते ४०-१२१५५

४१ ते ६०-९७९८

६१ वर्षांवरील- ३४२२