शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

शाळांमध्ये अग्निशमन यंत्र व प्रथमोपचार पेटीच नाही

By admin | Updated: December 4, 2014 23:07 IST

शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने २७ नोव्हेंबर २०१० ला राज्यातील सर्व शाळांना सुरक्षेच्या दृष्टीने अग्निशमन यंत्र व प्रथमोपचार पेटी ठेवण्याचे आदेश काढले होते. तसेच शाळा इमारतीच्या परिसरात

टेमुर्डा : शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने २७ नोव्हेंबर २०१० ला राज्यातील सर्व शाळांना सुरक्षेच्या दृष्टीने अग्निशमन यंत्र व प्रथमोपचार पेटी ठेवण्याचे आदेश काढले होते. तसेच शाळा इमारतीच्या परिसरात ज्वलनशिल पदार्थ ठेवण्यावर प्रतिबंध लावला होता. परंतु या आदेशाला तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधी लोटूनही वरोरा तालुक्यात एकाही शाळेत अग्निशमन यंत्राची वा प्रथमोपचार पेटीची व्यवस्था करण्यात आली नाही. या अनास्थेमुळे शाळा व्यवस्थापनाद्वारे शासनाच्या निर्देशाची अवहेलना होत आहे. गंभीर बाब म्हणजे प्रशासनाकडून याबाबत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. शासनाच्या निर्देशानुसार नवीन शाळांच्या इमारतींचे बांधकाम पूर्णत: सुरक्षेचे मापदंड लक्षात घेवून केले जाते. सर्व शाळांत अग्निशमन यंत्र चालविण्याचे प्रशिक्षण कमीत कमी दोन व्यक्तींना असावे व अग्निशमन यंत्राजवळ त्या व्यक्तीचे नाव स्पष्ट अक्षरात लिहिलेले असावे. यासोबतच सर्व शाळांमध्ये प्रथमोपचार पेटी देण्यात यावी. गट शिक्षणाधिकाऱ्यांद्वारे प्रशिक्षण कार्यक्रमात मुख्याध्यापक, शिक्षकांना प्रशिक्षण दिले जावे, पुरेशा सुरक्षा व्यवस्थेसाठी मुख्याध्यापक शिक्षणाधिकारी यांना जबाबदार ठरविण्यात यावे, अशा तरतुदी नियमात करण्यात आल्या आहेत. शासनाच्या निर्देशानुसार बालवाडी व पूर्व माध्यमिक शाळा इमारतीच्या खालच्या मजल्यावर असायला हवी. मात्र शासनाद्वारे जाहीर दिशा निर्देशाचे पालन जिल्ह्यात कुठेही होत नसल्याचे दिसून येत नाही. जिल्ह्यात शेकडो शाळा आहेत. त्यात शासकीय, निमशासकीय खासगी शाळांचा समावेश आहे. सर्व शाळांत आगीपासून बचाव करण्यासाठी कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था करण्यात आली नाही. जिल्ह्यात अनेक शाळांमध्ये प्रथमोपचार पेटीच उपलब्ध नाही. शासनाच्या आदेशाची शाळा, तेव्हा प्रशासनानद्वारे उपेक्षा केली जात आहे. असे असतानाही शिक्षण विभागाद्वारे अद्यापही कोणत्याही शाळा प्रशासनावर कारवाई करण्यात आली नाही. या शाळा इमारतीचे बांधकामही सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीकोणातून केले जात नाही. व्यवस्थापनाकडून प्रशासनाची दिशाभूल केली जात असल्याचे चित्र सर्वत्र आहे. (वार्ताहर)