शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

संस्था पदाधिकाऱ्याच्या पुत्राची शाळेत गुंडागर्दी

By admin | Updated: July 13, 2015 01:11 IST

कुंभेझरी येथील कै. अण्णाभाऊ साठे विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात संस्थेच्या कोषाध्यक्षा असलेल्या महिलेच्या सुपुत्राने मद्यधुंद अवस्थेत गुंडगिरी करून ...

दोघांना अटक : कुंभेझरी येथील घटनागडचांदूर : कुंभेझरी येथील कै. अण्णाभाऊ साठे विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात संस्थेच्या कोषाध्यक्षा असलेल्या महिलेच्या सुपुत्राने मद्यधुंद अवस्थेत गुंडगिरी करून कर्मचारी व विद्यार्थ्यांना तब्बल दोन ते तीन तास वेठीस धरल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे मुख्याध्यापक, शिक्षक कर्मचारी, विद्यार्थी दहशतीखाली असून या गुंडप्रवृत्तीच्या पुत्राकडून शाळेतील कर्मचाऱ्यांच्या जीविताला धोका असल्याची तक्रार प्राचार्य डी. एन. तेलंग यांनी पोलिसात दिली. यावरून जिवती पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. आशिष नरसिंग नामवार व त्र्यंबक सोपान सूर्यवंशी असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. जिवती तालुक्यातील कुंभेझरी येथील कै.अण्णाभाऊ साठे विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय व जिजामाता मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह आहे. प्राचार्यच्या कक्षात प्राचार्य दीपक तेलंग, वसतिगृहाचे अधीक्षक विनोद डवरे, कामाठी भोला धोबे, शिपाई मारोती बोरीकर, संस्थेचे संचालक संतोष मोतेवाड चर्चा करीत असताना संस्थेच्या कोषाध्यक्ष श्रीमती नामवार यांचा मुलगा आशिष नरसिंग नामवार व त्र्यंबक सोपान सूर्यवंशी यांनी प्राचार्यच्या कक्षेत प्रवेश करून प्राचार्य दीपक तेलंग व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत दगडफेक सुरू केली. सुदैवाने विद्यार्थ्यांना दगड लागला नाही. आशिषचा मद्यधुंद स्थितीतील रूद्रवतार बघून त्याला कक्षात कुलूप लावून बंद केले व या घटनेची तक्रार जिवती पोलीस ठाण्यात देण्यात आली. त्यानुसार आशिष नामवाड व त्र्यंबक सूर्यवंशी यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली.दोघेही गुंड प्रवृत्तीचे असल्याने जिविताला धोका असून त्यांना हद्दपार करण्याची मागणी प्राचार्य दीपक तेलंग व संचालक संतोष मोतेवाड यांनी केली आहे. (वार्ताहर)