शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 23:27 IST

केंद्र व राज्य शासनाने शालेय पोषण आहार कर्मचाºयांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे १८ हजार रुपये वेतन द्यावे, वित्तमंत्री अरुण जेटली व कामगार मंत्री बंडारु दत्तात्रय यांनी जाहीर केल्यानुसार प्रतीदिन ३५० रुपये वेतन, आरोग्य विमा व भविष्य निर्वाह निधी, सामाजिक सुरक्षा देण्याबाबत शासन आदेश त्वरित काढण्यात यावा. तर शिक्षणमंत्री यांनी मासिक पाच हजार रु. मानधन देण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण करावे, या मागणीसह इतर अनेक मागण्यांच्या पूर्ततेकरिता आयटकच्या नेतृत्वात सोमवारी जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देआयटकची मागणी : १८ हजार रुपये वेतन लागू करा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्र व राज्य शासनाने शालेय पोषण आहार कर्मचाºयांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे १८ हजार रुपये वेतन द्यावे, वित्तमंत्री अरुण जेटली व कामगार मंत्री बंडारु दत्तात्रय यांनी जाहीर केल्यानुसार प्रतीदिन ३५० रुपये वेतन, आरोग्य विमा व भविष्य निर्वाह निधी, सामाजिक सुरक्षा देण्याबाबत शासन आदेश त्वरित काढण्यात यावा. तर शिक्षणमंत्री यांनी मासिक पाच हजार रु. मानधन देण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण करावे, या मागणीसह इतर अनेक मागण्यांच्या पूर्ततेकरिता आयटकच्या नेतृत्वात सोमवारी जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.यावेळी सरकारच्या विरोधात तीव्र नारेबाजी केली. संघटनेचे राज्य महासचिव विनोद झोडगे, जिल्हाध्यक्ष संतोष दास, जिल्हा संघटक श्रीधर वाढई, छाया मोहितकर, कल्पना रायपुरे, कुंदा कोहपरे, सुलोचना उराडे, संभाजी रायवाड, मधुकर वनकर, रेखा नंदूरकर यांच्या शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी पापळकर यांना निवेदन देऊन त्यांच्या मार्फत मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री व अर्थमंत्री यांना विविध मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले आणि स्थानिक मागण्याविषयी चर्चा करण्यात आली.आयटकच्या नेतृत्वात अनेक शालेय पोषण आहार कर्मचाºयांच्या मानधन वाढीसाठी अनेक मोर्चे काढले व आपली मागणी शासनापुढे परत-परत मांडली होती. त्यामुळे पुणेच्या शिक्षण संचालकांनी २३ नोव्हेंबर २०१६ रोजी मासिक पाच हजार रुपये मानधन वाढीचा प्रस्ताव शासनाला सादर केला होता. त्या अनुषंगाने शिक्षणमंत्री यांच्या निर्देशानसुार २० मार्च २०१७ ना. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई मंत्रालयात संघटनेसोबत बैठक आयोजित केली होती. त्यामध्ये मासिक पाच हजार मानधन देण्याचे ठरले होते. परंतु त्याची पूर्तता झालेली नाही. तसेच शापोआ कर्मचाºयांना पांडेचेरी १४ हजार, केरळ १० हजार, तामिळनाडू ७८०० तर इतर राज्यात पाच हजार रुपये मानधन दिल्या जात असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यासंबंधी चर्चा करुन तसा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते. परंतु त्याचीही अंमलबजावणी झालेली नाही. शापोआ कर्मचाºयांना मिळणारे मासिक एक हजार रुपये मानधन व इंधन बीलसुद्धा मागील फेब्रुवारी महिन्यापासून मिळाले नाही. त्यामुळे स्वंयपाकी महिलाच्या इंधन बिलाची रक्कम मिळण्यास विलंब होत आहे. त्यामुळे संचालकांनी सदर महिन्याचे बील आॅफलाईन पद्धतीने काढण्याची परवानगी द्यावी, शापोआ कर्मचाºयांकडून दरवर्षी करारनामा करण्याची पद्धत बंद करण्यात यावी, त्याऐवजी कामावर लागलेल्या दिवसापासून नियुक्त पत्र देण्यात यावे व हजेरीपट ठेवण्यात यावे आदी अनेक मागण्या यावेळी लावून धरण्यात आल्या.